Traffic Police: 'हेलो गोयंकार' कार्यक्रमातील मागणी मुख्यमंत्र्यांनी केली पूर्ण; गवंडाळीत वाहतूक पोलिसांची नेमणूक

राज्यातील वाढते अपघात पाहता सरकार आणि वाहतूक पोलीस अधिकच सतर्क झाले आहे.
Traffic Police at Gaundalim
Traffic Police at Gaundalim Dainik Gomantak

Traffic Police at Gaundalim: राज्यातील वाढते अपघात पाहता सरकार आणि वाहतूक पोलीस अधिकच सतर्क झाले आहे. यासंदर्भात राज्यभरात पोलीस ठिकठिकाणी वाहतूक मोहीम राबवत आहेत. दरम्यान आज जुने गोवा येथे सुरळीत वाहतुकीसाठी पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे.

Traffic Police at Gaundalim
Vijai Sardesai : ...इस्पितळ खाजगी कंपनीला दिल्यास आंदोलन : सरदेसाई

काही दिवसांपूर्वी, मुख्यमंत्र्यांच्या 'हेलो गोयंकार' या कार्यक्रमात शिवानंद शेटये या गृहस्थांनी गवंडाळी रस्त्यावरील वाहतूक रहदारीला शिस्त नसल्याचे नमूद केले होते. या परिसरात वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी त्यांनी तिथे वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

या पार्श्वभूमीवर आज या परिसरात वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, गवंडाळी रेल्वे क्रॉसिंगजवळ पोलिसांनी तपासणी केली असता, वाहनचालक नियमांचे पालन करत नसल्याचे पणजी वाहतूक पोलीस निरीक्षक चेतन सुर्लीकर यांच्या निदर्शनास आले.

दरम्यान, नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांकडून दंड आकरण्यात येणार असल्याचे पोलीस निरक्षकांनी सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com