Christmas 2023 : किनाऱ्यांवर पर्यटकांचा महासागर! वाहतुकीची प्रचंड कोंडी

Christmas 2023 : हॉटेल्‍स फुल्ल; व्‍यावसायिकांना सुगीचे दिवस
Christmas celebration in goa
Christmas celebration in goa Dainik Gomantak
Published on
Updated on

Christmas 2023 : हरमल वीकेंडला आलेल्‍या सलग सुट्ट्या, उद्या राज्‍यात साजरा होणार नाताळ सण आणि पाच ते सहा दिवसांवर येऊन ठेपलेला नववर्षाचा उत्‍साह, या पार्श्वभूमीवर राज्‍यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी पूर्णपणे भरून गेलेले आहेत.

प्रसिद्ध कळंगुट किनाऱ्यावर तर आज रविवारी पर्यटकांची जत्राच भरली होती. शिवाय कांदोळी, बागा, हणजूण, वागातोर, हरमल, मोरजी, केरी तसेच दक्षिण गोव्यातील कोलवा, बाणावली, पाळोळे, वेळसाव, केळशी आदी किनाऱ्यांवरही पर्यटकांची गर्दी दिसून आली. त्‍यामुळे या परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी होण्‍याचे प्रकार घडले.

विदेशी पर्यटकांच्‍या तुलनेत देशी पर्यटकांची संख्‍या खूपच जास्‍त आहे. बहुतांश हॉट‍ल्‍स फुल्ल झाली असून, व्यावसायिकांमध्‍ये समाधान व्‍यक्त केले जात आहे. मात्र भिकाऱ्यांच्‍या उपद्रवामुळे पर्यटकांत नाराजी व्यक्त होत आहे.

सध्‍या किनारी भागात रात्री १० वाजेपर्यंत संगीत वाजवण्याची मुभा आहे. तरीसुद्धा पर्यटक मौजमजा करताना दिसत आहेत. किनारी भागात यंदाच्या वर्षी पर्यटकांनी चार दिवस आधीच मुक्काम ठोकल्याने व्यावसायिकांची चांदी झालेली आहे. मात्र पार्किंगसाठी जागा नसल्याने ग्राहकांत नाराजी व्‍यक्त केली जात आहे, असे व्यावसायिक दिनेश पेडणेकर यांनी सांगितले.

Christmas celebration in goa
Goa Petrol-Diesel Price: गोव्यात इंधनाच्या किमती घटल्या; जाणून घ्या 24 डिसेंबरचे पेट्रोल आणि डिझेलचे दर

वेश्याव्यवसायात विदेशी युवती!

किनारी भागात काही विदेशी युवती वेश्‍‍याव्यवसायात गुंतल्या असून, त्‍या भडक मेकअप करून रस्त्याच्‍या बाजूला थांबलेल्या दिसून येतात. त्यांची कोड भाषा पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी असते व त्यासाठीच त्यांचा पेहराव भडक असतो.

नायजेरियन युवती तर बऱ्याच सक्रिय झाल्या असून, गेल्या आठवड्यात एक प्रकरण बाचाबाचीपर्यंत गेले होते. विदेशींबरोबर देशी युवतींनाही गोव्‍यात आणून वेश्‍‍याव्‍यवसायात गुंतले जात असल्‍याचे अनेकादा स्‍पष्‍ट झाले आहे.

पर्यटनाच्या गोंडस नावाखाली ड्रग्‍सविक्री

पर्यटनाच्या गोंडस नावाखाली किनारपट्टीवर ड्रग्‍सविक्री खुलेआम सुरू आहे. शिवाय कपडेविक्रेत्या, भिकाऱ्यांचा उपद्रव सुरूच आहे.

त्याला जोडूनच बेकायदा संगीत रजनी सायंकाळी सुरू होते ती काही ठिकाणी पहाटेपर्यंत चालू असते. ध्वनिप्रदूषणाचा मारा स्थानिकांना सहन करावा लागतोय आणि पुढच्‍या पाच-सहा दिवसांत त्‍याचा कडेलोट होऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com