Ferry Boat: प्रशिक्षित खलाशी नसल्याने सौरऊर्जेवरील फेरीबोट बंद

चोडण ते पणजी या जलमार्गावर प्रवासी वाहतूक करण्यासाठी राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून सौरऊर्जेवरील फेरीबोट तयार करून घेतली. सध्या फेरीबोट प्रशिक्षित खलाशी नसल्याने तशीच विनावापर धक्क्यावर उभी आहे.
Goa | Solar Ferry Boat
Goa | Solar Ferry BoatDainik Gomantak
Published on
Updated on

Solar Ferry Boat: चोडण ते पणजी या जलमार्गावर प्रवासी वाहतूक करण्यासाठी राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून सौरऊर्जेवरील फेरीबोट तयार करून घेतली. या फेरीबोटीचे जोरदार लोकार्पणही पणजीत झाले. परंतु त्यानंतर ही फेरीबोट प्रशिक्षित खलाशी नसल्याने तशीच विनावापर धक्क्यावर उभी आहे.

फक्त प्रवासी वाहतूक करण्यासाठी ही फेरीबोट वापरात येणार होती, त्याशिवाय या प्रवासासाठी काही प्रमाणात शुल्कही आकारण्यात येणार होते. परंतु चोडण ते रायबंदर या मार्गावर अगोदरच असणाऱ्या फेरीबोटीचा वापर प्रवासी मोठ्या प्रमाणात करतात.

सौरऊर्जेवरील फेरीबोटीत वाहन नेण्याची सोय नाही, त्यामुळे या फेरीबोटीकडे जाणार कोण? असाही प्रश्‍न यापूर्वीच उपस्थित झाला होता.

दरम्यान, नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनीही या फेरीबोटीसाठी प्रशिक्षित खलाशी नसल्याने तिची सेवा बंद आहे. त्यामुळे आता ज्या कंपनीने ही बोट बांधली आहे, त्यांची मदत खाते घेणार असल्याची माहिती दिली आहे.

Goa | Solar Ferry Boat
Cashew Farm Fire: म्हाऊस येथे काजू बागायतीत मोठी आग; तब्बल 50 हजारांचे नुकसान

बोट चालवणार कोण?

राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून सौरऊर्जेवरील बोट तयार करून घेतली. खात्याकडे ती बोट चालविण्यासाठी प्रशिक्षित खलाशी नाही हे माहिती असूनही ही बोट तयार करण्याची आणि आणण्याची घाई कोणाला झाली होती,

याचे कोडे मात्र बंदर कप्तान खात्यातील अनेकांना अद्याप उलगडलेले नाही. बोट आणली पण चालवणार कोण, असा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com