Children's Film Festival :‘बुलबुल’ बालचित्रपट महोत्सवाला भव्य प्रतिसाद

Children's Film Festival यावेळी सर्वच स्क्रीनवर वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट पाहण्यासाठी मुले उत्साहित होत असल्याचे चित्र दिसत होते.
Children's Film Festival
Children's Film Festival Dainik Gomantak
Published on
Updated on

Children's Film Festival : सासष्टी, मडगावच्या रवींद्र भवनमध्ये गोव्याच्या माहिती व प्रसिद्धी खात्याच्या सहकार्याने अंतरंग क्रिएशन्सने आयोजित केलेल्या ‘बुलबुल’ आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवाला बुधवारी (ता.१०) दुसऱ्या दिवशी भव्य प्रतिसाद लाभला.

शेकडो मुलामुलींनी व त्यांच्या पालकांनीही बरीच गर्दी केली होती. यावेळी सर्वच स्क्रीनवर वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट पाहण्यासाठी मुले उत्साहित होत असल्याचे चित्र दिसत होते.

शिवाय चित्रपटाव्यतिरिक्त खुल्या मैदानावरील डिजिटल प्लेनेटोरियम तसेच चित्रपटाची चित्रिकरण प्रात्यक्षिके पाहण्यास मुलांची जास्त गर्दी दिसत होती.

Children's Film Festival
Goa Congress: गोव्यात काँग्रेस लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकेल; माणिकराव ठाकरेंचा विश्वास

सायंकाळी नकलांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. गुरुवारी (ता.११) तिसऱ्या दिवशी खुल्या रंगमंचावर तीन लघुपट दाखविण्यात येतील. शिवाय सकाळी १० वाजता पालकत्वावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com