Chief Minister Dr. Pramod Sawant: कला अकादमीच्या कामाबाबतचा आत्तापर्यंतच्या सद्यःस्थितीचा संपूर्ण अहवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वतःकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मागवला आहे. आता या अहवालानंतर कारवाई कोणावर होणार आणि खापर कोणाच्या डोक्यावर फुटणार, हे स्पष्ट होणार आहे.
कला अकादमीतील गळतीच्या कामावरून कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे बोट दाखविल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वरील पाऊल उचलले आहे. कला अकादमीत काही दिवसांपूर्वी तियात्रावेळी छतातून पावसाच्या पाण्याची गळती लागली. त्यामुळे कला-संस्कृतीमंत्री तथा कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांच्यावर सर्व थरांतून टीका झाली होती. परंतु गावडे यांनी हात वर करताना सार्वजनिक बांधकाम खात्याकडे बोट दाखविले होते. दरम्यान, सभापती रमेश तवडकर आणि कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे या सरकारमधील दोन एसटी नेत्यांमधील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
साबांखा अभियंत्यांनी सांगितले की, आमच्याकडे सद्यःस्थितीतील अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाने मागितला आहे. परंतु कला अकादमीचे खुले व्यासपीठ कोसळल्यानंतर ज्या आयआयटीने तपासणी केली होती, तो अहवाल अद्याप आलेला नाही. गळतीनंतर जी पावले उचलणे आवश्यक होते, ती साबांखाने उचलली आहेत. कला अकादमी अजूनही कला-संस्कृती खात्याकडे सोपविण्यात आलेली नाही.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रमुखांकडे कला अकादमीच्या कामाचे सर्व अहवाल मागितले आहेत. कला अकादमीत जी-जी कामे झालेली आहेत, त्यांचा तसेच गळतीबाबतच्या कामाचा तपशीलही देण्यास सांगितले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.