Pooja Naik Case: पूजा नाईकच्या अडचणीत वाढ; म्हार्दोळ पोलिसांनी नोंदवला गुन्हा

Cash for Job Scam: श्रीधर सतरकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी पूजा नाईकविरुद्ध गुन्हा दाखल केला.
Pooja Naik: पूजा नाईकच्या अडचणीत वाढ; म्हार्दोळ पोलिसांनी नोंदवला गुन्हा
Pooja Naik CaseDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पूजा नाईक प्रकरण चांगलंच गाजत आहे. यातच आता, श्रीधर सतरकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पूजा नाईकविरुद्ध म्हार्दोळ पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. दोन दिवसांपूर्वी, या प्रकरणातील संशयित सरकारी अधिकारी श्रीधर सतरकर यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. चौकशीनंतर सतरकर बेपत्ता होते. पूजाला दोन सरकारी अधिकारी मदत करत असल्याचे समोर आले होते.

सरकारी अधिकाऱ्यांचे लागेबांधे

दरम्यान, या दोन सरकारी अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी हा निवृत्त झाला आहे, तर एकजण अजूनही सरकारी सेवेत आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांचे संशयित पूजा नाईकशी लागेबांधे असल्याचे समोर आले होते. दुसरीकडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील या प्रकरणाची दखल घेत या दोन संशयित अधिकाऱ्यांची चौकशी होणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिली होती.

न्यायालयीन कोठडी

'कॅश फॉर जॉब' स्कॅम प्रकरणी पूजा नाईक हिला दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पाच दिवसांच्या कोठडीचा रिमांड संपल्यानंतर सोमवारी (4 नोव्हेंबर) पूजा हिला डिचोलीच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाकडून रिमांड मंजूर करण्यात आला. सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांना गंडा घालणारी पूजा नाईक हिला फोंडा प्रथमवर्ग न्यायालयाने 20 हजार रुपयांची हमी आणि अन्य अटींवर सशर्त जामीन मंजूर केला होता, मात्र या अटींची पूर्तता करेपर्यंत तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. पोलिसांनी आत्तापर्यंत नऊ जणांना ताब्यात घेतले असून, अजून काही नावे समोर येण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com