Margao News : कोकणी भाषा मंडळातर्फे शिक्षकांसोबत सृजन संवाद

Margao News : तज्ज्ञ वक्ते 210 शिक्षकांनी घेतले कौशल्याचे धडे
Margao
MargaoDainik Gomantak
Published on
Updated on

Margao News : मडगाव, कोकणी भाषा मंडळाने राजभाषा संचलनालय आणि एससीईआरटी यांच्या सहकार्याने सरकारी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.

दक्षिण व उत्तर गोव्यात दोन ठिकाणी झालेल्या या कार्यशाळांत मुलांना कथा, कविता, नाटक, चित्रकला आणि ॲनिमेशनच्या माध्यमातून चांगल्याप्रकारे कसे शिकवता येईल, यावर मार्गदर्शन करण्यात आले.

सेंट झेवियर्स कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने उत्तर गोव्यातील कार्यशाळा पार पडली. दोन्ही कार्यशाळांना २१० शिक्षक उपस्थित होते.

दक्षिण गोव्यातील कार्यशाळेचे उदघाटन रोझरी कॉलेजचे प्रशासक फा. गॅब्रियल कुतिन्हो यांच्या हस्ते झाले. सेंट झेवियर्स कॉलेजच्या प्राचार्य प्रो. डॉ. ब्लांच मास्कारेन्हास यांच्या हस्ते उत्तर गोव्यातील कार्यशाळेचे उदघाटन झाले.

यंदा शिक्षकांसाठी अशाच प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करण्यास उत्सुक असलेल्या कोकणी भाषा मंडळाने जुलैमध्ये सरकारी अनुदानित प्राथमिक शाळांच्या शिक्षकांसाठी अशीच दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती.

सर्जनशील संवादाद्वारे संपूर्ण राज्यातील शिक्षकांपर्यंत पोहोचण्याचे मंडळाचे उद्दिष्ट आहे. या कार्यशाळा नियमितपणे होत राहतील. शिक्षकांना वेळोवेळी अतिरिक्त मार्गदर्शन आणि सर्जनशील संसाधने उपलब्ध व्हावीत, असे मंडळाला वाटते.

Margao
Goa Politics: वॉरन आलेमावांकडून सरदेसाईंचे अभिनंदन

कलेच्या माध्यमातून मार्गदर्शन

या कार्यशाळेत विविध सर्जनशील कलांच्या साहाय्याने शिक्षण कसे समृद्ध करायचे, याचे मान्यवरांनी शिक्षकांना प्रशिक्षण दिले. नयना आडारकर, चेतन आचार्य आणि पलाश अग्नी यांनी बाल साहित्याविषयी मार्गदर्शन केले.

डॉ. तन्वी कामत बांबोळकर आणि प्राजक्ता कवळेकर यांनी नाटकातून, रत्नमाला दिवकर यांनी कविता आणि संगीतातून आणि सिद्धेश गावणेकर यांनी ॲनिमेशन व कलेच्या माध्यमातून कसे शिकवायचे, याविषयी शिक्षकांना मार्गदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com