Anjuna Illegal Construction: हणजूणच्या किनारी भागात बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेली 38 बांधकामे एका आठवड्यात पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज (दि.22) दिले.
दरम्यान, बेकायदेशीर बांधकामं पाडण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र हणजूणच्या सचिवांनी यापूर्वी सादर केले होते. पण बांधकामं तशीच असल्याचे पुराव्यासह न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने दिशाभूल केल्याचे प्रकरण न्यायालयाने गांभीर्याने घेतले आहे.
हणजूण किनाऱ्यावरील 38 बेकायदेशीर बांधकामे बार्देशच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी एका आठवड्यात जमीन दोस्त करावी आणि कृती अहवाल सादर करावा असे आदेश न्यायालयाने हणजूणचे सरपंच, सचिव, नगरनियोजन खात्याचे अधिकारी, जीसीझेडएमए यांना दिले आहेत.
तसेच, बांधकाम पाडल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी पंचायतीचे सचिव जितेंद्र नाईक आणि माजी सचिव धर्मेंद्र गोवेकर यांना 31 जानेवारीपूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करावे.
पंचायत संचालकांनी 31 जानेवारीला न्यायालयात येऊन सचिवांवर काय कारवाई करणार? याची माहिती द्यावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.