Neena Gupta Video: 'झाले बाबा एकदाची VIP' अभिनेत्री नीना गुप्ता यांनी गोवा आणि मोपाचे आभार का मानले?

यापूर्वी बरेली विमानतळावरील आरक्षित लाउंजमध्ये त्यांना प्रवेश नाकारला होता.
Neena Gupta Video
Neena Gupta Video
Published on
Updated on

Neena Gupta Video: बॉलिवूडमधील एक फिअरलेस अभिनेत्री अशी ओळख असलेल्या नीना गुप्ता यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. गोव्यातील मोपा विमानतळावर नीना यांना व्हीआयपी लाउंजमध्ये प्रवेश देण्यात आला.

त्यानंतर त्यांनी गोवा राज्य आणि मोपा विमानतळाचे आभार मानले आहेत. यापूर्वी बरेली विमानतळावरील आरक्षित लाउंजमध्ये त्यांना प्रवेश नाकारला होता. त्यामुळे हा व्हिडिओ अधिक व्हायरल होत आहे.

नीना गुप्ता यांनी गोव्यातून एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. अखेर गोव्यातील मोपा विमानतळाच्या व्हीआयपी लाउंजमध्ये प्रवेश मिळाला असून, मी व्हीआयपी झाले आहे. याबाबत मी गोवा राज्य आणि मोपा विमानतळाचे आभार मानते.

यावेळी नीना यांनी विमानतळावरील कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानले आहेत. नीना यांच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या असून, नीना यांचे कौतुक केले आहे.

नीना गुप्ता यांची जिवलग मैत्रिण सोनी राजदान हिने "किती छान लाउंज आहे." अर्चना पूरण सिंहने, "हाहाहा खूप सुंदर." असी कमेंट केली आहे.

Neena Gupta Video
रेल्वेतून गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी; सुरत स्थानकावर मुद्देमालासह चार जणांना अटक

नीना गुप्ता यांना बरेली (उत्तर प्रदेश) विमानतळावरील आरक्षित लाउंजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता, यावेळी त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता.

आरक्षित लाउंजमध्ये मला प्रवेश देण्यात आला नाही, मला वाटले मी व्हीआयपी आहे पण मी अजून व्हीआयपी बनले नाही आणि त्यासाठी मला अजून मेहनत घ्यावी लागेल. व्हीआयपी होण्यासाठी मी मेहनत घेईन असे नीना गुप्ता म्हणाल्या होत्या.

नीना गुप्ता बेधडक आणि खूप बोल्ड वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अलिकडेच एका पार्टीत त्या सहभागी झाल्या होत्या, त्यावेळी त्यांनी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली होती.

या व्हिडिओ पोस्टला त्यांनी "गरमी है तो क्या? बूट पहले का शुक तो पुरा कर लिया." असे कॅप्शन दिले होते.

नीना जाने भी दो यारों, मंडी, उत्सव, बटवारा यांसारख्या चित्रपटात लक्षात राहणाऱ्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय मसाबा मसाबा, पंचायत, मेड इन हेवन यातील त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com