Goa Politics: भाजपचा उमेदवार होणार 19 मार्चपर्यंत निश्चित

Goa Politics: काँग्रेसची उमेदवार यादी लवकरच जाहीर
Goa BJP
Goa BJPDainik Gomantak

Goa Politics:

भाजप आणि काँग्रेस यांच्या लोकसभा उमेदवारांची यादी आता येत्या आठवड्याच्या सुरवातीला जाहीर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने उत्तर व दक्षिण गोवा, तर भाजपने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अद्याप जाहीर करायचा आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना मंत्रालयात आज सायंकाळी याबाबत विचारले असता ते म्हणाले, भाजपचे उमेदवार दिल्लीतून जाहीर होतात आमच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची तिसरी यादी 18 किंवा 19 मार्च रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यात दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचा समावेश असेल.

Goa BJP
Goa Education: शैक्षणिक बदल! राज्यात यंदापासून अकरावी, बारावीचे विभाग रद्द

राहुल गांधी यांची न्याय यात्रा शनिवारी उशिरा मुंबईत पोहोचणार आहे. रविवारी मुंबईत जाहीर सभा झाल्यानंतर काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची सोमवारी किंवा मंगळवारी दिल्लीत बैठक होऊन त्यात गोव्यातील दोन्ही जागांवरील उमेदवारांबाबत निर्णय होणार आहे.

Goa BJP
South Goa: दक्षिण गोव्यात सुरू करणार खासगी वैद्यकीय महाविद्यालय

सरकारने लोकांच्‍या शंका दूर कराव्यात : सरदेसाई

दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळ परिसरात खासगी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्‍याचा निर्णय सरकारने घेतला आहे, त्‍यावर गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यापूर्वी लोकांच्या शंका प्रथम दूर कराव्यात, असे म्हटले आहे.

या महाविद्यालयाला मंत्रिमंडळाची मान्यता देण्‍यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि उत्तरे मिळत नाहीत. रुग्णालयाचा मूळ उद्देश गरजूंना मोफत उपचार देणे हा होता. ज्यासाठी धर्मादाय वृत्तीच्‍या लोकांंकडून जमीन संपादित करण्यात आली होती. हे प्राथमिक उद्दिष्ट आता कायम राहील का? असे त्यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com