St. Xavier DNA Controversy: कुणाकुणाला समज द्यायची? सिक्वेरांच्या DNA वरील विधानावरून प्रदेशाध्यक्ष उद्विग्न

Subhas Velingkar Controversy: पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी केलेल्या विधानाबद्दल त्यांचा भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी वैयक्तीक पातळीवर समाचार घेतल्याच्या २४ तासांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यानीही सिक्वेरांचे कान टोचले.
Sadanand Tanavade | Aleixo Sequeira
Sadanand Tanavade | Aleixo Sequeira DG
Published on
Updated on

Sadanand Tanavades Response To Aleixo Sequeira About Subhas Velingkar Statement on SFX

पणजी: पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी केलेल्या विधानाबद्दल त्यांचा भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी वैयक्तीक पातळीवर समाचार घेतल्याच्या २४ तासांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यानीही सिक्वेरांचे कान टोचले. सिक्वेरांचे विधान निश्चितपणे चुकीचे आहे आणि तसे त्यांनी बोलायला नको होते अशा शब्दांत त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. आपण कोणा कोणाला समज देत फिरू असे उद्विग्न उद्‍गारही त्यांनी काढले.

गोव्यातील प्रत्येकाच्या रक्तात सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे जनुक असल्याचे सिक्वेरा यांनी म्हटले होते. त्याबाबत तानावडे यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, मंत्रिपदी असलेल्या व्यक्तीने अधिक जबाबदारीने बोलावे लागते. आपल्या वक्तव्याचा कोणता अर्थ काढला जाऊ शकतो याचा अंदाज घेऊनच बोलावे लागते.

Sadanand Tanavade | Aleixo Sequeira
Subhash Velingkar: वेलिंगकर अटकेला 'का' घाबरले? धार्मिक तेढ रोखण्यात अपयशी 'सावंत सरकार' बरखास्त करण्याची मागणी

सिक्वेरा यांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही निश्चितपणे सहमत नाही. त्यांनी असे बोलायला नको होते. त्यांनी सर्व समाजाला गृहित धरू नये. हिंदूंच्या वतीने त्यांनी बोलू नये. त्यांनी आता माफी मागितली आहे. आपण कोणत्या संदर्भात बोललो होतो तेही त्यांनी स्पष्ट केले असले तरी वाद सुरू झाला असताना समाजमन काहीही ऐकण्यास तयार नसते. तरीही हिंदूंनी सहिष्णूपणे याकडे पाहिले हे उत्तमच झाले. यापुढे सिक्वेरा यांनी अशी वक्तव्ये करणे टाळावे असा त्यांना सल्ला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com