Traffic Police : डिचोली वाहतूक पोलिसांकडून काळ्या काचांविरोधात कारवाई

Traffic Police : सत्तरीसह डिचोली वाहतूक पोलिस विभागाच्या कार्यक्षेत्रात गेल्या तीन दिवसांत २० हून अधिक वाहनधारकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
Goa Traffic Police
Goa Traffic PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Traffic Police : डिचोली, ‘टिंटेड’ (काळ्या) काचा बसविलेल्या वाहनांविरोधात डिचोली वाहतूक पोलिसांनी कडक मोहीम हाती घेतली आहे.

सत्तरीसह डिचोली वाहतूक पोलिस विभागाच्या कार्यक्षेत्रात गेल्या तीन दिवसांत २० हून अधिक वाहनधारकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

गेल्या बुधवारी ‘टिंटेड’ काचांचा हा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला होता. ‘टिंटेड’ काचा बसविलेल्या वाहनांविरोधात कडक कारवाईची मागणी विधानसभेत करण्यात आली होती.

त्यानंतर डिचोली वाहतूक पोलिसांनी ‘टिंटेड’ काचा बसविलेल्या वाहनांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

डिचोली वाहतूक पोलिस विभागाचे निरीक्षक गौरेश मळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. ‘टिंटेड’ काचा बसविलेल्या मोटारगाड्या अडवून वाहतूक पोलिसांनी बहुतेक मोटारगाड्यांच्या काचांना बसविलेले ‘टिंटेड’ काढले.

‘टिंटेड’ काचा बसविलेल्या वाहनांविरोधात कारवाईची ही मोहीम चालूच राहणार असल्याचे संकेत वाहतूक पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळाले आहेत.

Goa Traffic Police
Goa Casino: राज्य सरकारच्या तिजोरीत 820 कोटींची भर; कॅसिनो बंदीचा प्रश्न अद्यापही प्रलंबित

वाहनांना ‘लॉक’!

डिचोली शहरातील बेशिस्त पार्किंग विरोधातही डिचोली पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाई सुरू केली आहे. ‘नो पार्किंग’ क्षेत्रात वाहने पार्क करणाऱ्या वाहनांना वाहतूक पोलिसांकडून ‘लॉक’ लावण्यात येत आहेत.

दंड भरल्यानंतरच ‘लॉक’ काढण्यात येते. शुक्रवारी सायंकाळी वाहतूक पोलिसांनी शहरात बेशिस्तपणे उभ्या केलेल्या काही वाहनांना ‘लॉक’ लावण्याची कारवाई केली. वाहतूक पोलिसांच्या या कारवाईचे शहरात समर्थन होत असून कारवाई चालूच ठेवावी, अशी मागणी जनतेकडून होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com