Parra News : बिनभिंतीच्या शाळेत विद्यार्थी रमले;‘ साळ पुनर्वसन’चा उपक्रम

Parra News : वटवृक्षाखाली स्टोन पेंटिंगवर कार्यशाळा
Parra
ParraDainik Gomantak

Parra News :

पर्ये, उपक्रमशील शाळा म्हणून नावारूपास आलेल्या साळ पुनर्वसन डिचोलीच्या विद्यार्थ्यांनी येथे नुकताच ‘बिनभिंतीच्या शाळेचा’ अनुभव घेतला. येथील परिसरात असलेल्या एका वटवृक्षाखाली सत्तरीतील बहुआयामी कलाकार रामकृष्ण गावस यांची स्टोन पेंटिंगवर कार्यशाळा घेण्यात आली.

सम्राट क्लब डिचोली आणि सरकारी प्राथमिक विद्यालय पुनर्वसन शाळेने मिळून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

शालेय बिगर पुस्तकी विषयातील कला व हस्तकला वर्ग या वटवृक्षतळी घेण्याच्या उद्देशाने ‘बॅगलेस डे’ची संकल्पना राबवत कलाकार रामकृष्ण गावस यांची ‘स्टोन पेंटिंग’ कार्यशाळेतून दगडावर चित्र काढण्याचे प्रशिक्षण-प्रदर्शन व स्पर्धा यावेळी झाली. यावेळी गावस यांनी याविषयी मुलांना मार्गदर्शन करीत स्टोन पेंटिंगवरच्या विविध कलाकृती तयार करून घेतल्या.

यावेळी डिचोली सम्राट क्लबचे अध्यक्ष राहुल कवळेकर, कार्यक्रम अधिकारी भरत चणेकर, साळ पुनर्वसन शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष ऋतुजा गवस, प्रभारी मुख्याध्यापक धाकटू पाटील, पालक हेमंत च्यारी उपस्थित होते. यावेळी वर्गानुसार स्टोन पेंटिंगची स्पर्धा घेण्यात आली. यामधील विजेत्यांना सम्राट क्लब डिचोली यांनी बक्षिसे पुरस्कृत केली होती.

स्टोन पेंटिंग स्पर्धेतील विजेते

१ पहिलीच्या वर्गातून प्रथम पारितोषिक स्वरा जाधव, द्वितीय- आर्यन गवस तर तृतीय- स्वर्णिका शेट्ये यांना मिळाले. दुसरीच्या वर्गातून प्रथम पारितोषिक शनया गवस, द्वितीय- अस्मी गवस तर तृतीय- श्रीयश सावंत यांना मिळाले.

२ इयत्ता तिसरीतून प्रथम पारितोषिक तनिष परब, द्वितीय- दिव्यम म्हापसेकर, तृतीय- ओम ठाकूर यांना मिळाले. चौथीच्या वर्गातून प्रथम पारितोषिक भार्गवी देसाई, द्वितीय- राही देसाई, तृतीय- पूर्वी मणेरीकर यांना मिळाले.

Parra
Goa BJP: राहुल गांधींच्या 'त्या' विधानाचा तानावडे यांच्याकडून निषेध

मुलांचा हौसेने सहभाग

दरवर्षीप्रमाणे यंदाही हा ‘बिनभितींच्या शाळेचा’ उपक्रम राबवला. ‘बॅगलेस शाळा’ एखाद्या वृक्षाखाली घेत असल्याने विद्यार्थ्यांना यात खूप मजा येते आणि त्यात ते रममाण होऊन हौसेने सहभागी होतात आणि शिकतात.

यावेळेच्या उपक्रमात त्यांनी स्टोन पेंटिंगची कला शिकली असल्याचे प्रभारी मुख्याध्यापक धाकटू पाटील यांनी सांगितले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com