Bicholim Shimgotsav Festival : डिचोली शिमगोत्सवातील चित्ररथ स्पर्धेत महालक्ष्मी समिती प्रथम

Bicholim Shimgotsav Festival : स्पर्धांचा निकाल जाहीर : रोमटामेळ स्पर्धेत सुयोग मंडळ तर लोकनृत्य स्पर्धेत सरस्वती मंडळ प्रथम
Bicholim Shimgotsav Festival
Bicholim Shimgotsav FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim Shimgotsav Festival :

डिचोली, शिमगोत्सव समिती आयोजित चित्ररथ स्पर्धेत बांदोड्याच्या महालक्ष्मी नागरिक समितीच्या चित्ररथाने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. रोमटामेळ स्पर्धेत आडपईच्या सुयोग शिमगोत्सव मंडळाने तर लोकनृत्य स्पर्धेत कुर्टी-फोंडा येथील सरस्वती कला मंडळ पथकाने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.

सोमवारी (ता.१) घेतलेल्या पत्रकार परिषदेत डिचोली शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष तथा पालिकेचे मुख्याधिकारी सचिन देसाई, सरचिटणीस दिलीप धारगळकर आणि सचिव संजय खर्बे यांनी विविध स्पर्धांचा निकाल जाहीर केला.

विविध स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे-

चित्ररथ स्पर्धा : दुसरे- कुंभारजुवा नागरिक समिती (कुंभारजुवे), तिसरे- देव धाडेश्वर स्पोर्ट्‌स अँड कल्चरल क्लब (नेरुल-बार्देश), चौथे- कासवाडा नागरिक समिती (तळावली-फोंडा), पाचवे- बालगोपाळ सांस्कृतिक मंडळ (चिंबल) आणि उत्तेजनार्थ- धाडसाकळ स्टार्स अँड कल्चरल क्लब (माशेल) अन्य १६ पथकांना मानधन.

Bicholim Shimgotsav Festival
Gorakhpur To Goa Train: गोरखपूर ते गोवा रेल्वे धावणार; तयारीला वेग, एप्रिलमध्ये महत्वाची बैठक

रोमटामेळ स्पर्धा : दुसरे- पाईकदेव शिमगोत्सव समिती (सांगे), तिसरे- खांडेपार शिमगोत्सव समिती (खांडेपार), चौथे- नवदुर्गा गोपाळकृष्ण शिमगोत्सव समिती (बोरी) आणि पाचवे- कुडचडे-काकोडा शिमगोत्सव समिती. अन्य ५ पथकांना मानधन.

लोकनृत्य स्पर्धा : दुसरे- सख्याहरि (सावईवेरे-फोंडा), तिसरे- श्री कुलस्वामीनी कला संघ (मोर्ले-सत्तरी), चौथे- श्री नवदुर्गा कला मंडळ (मडकई), पाचवे- श्री विजया कला मंडळ (फोंडा), उत्तेजनार्थ-श्री वेताळ सांस्कृतिक मंडळ (काणकोण), ॐ नमः शिवाय (फोंडा), शिक्षा व्हिजन (डिचोली), नवदुर्गा कला संघ (काणकोण), शांतादुर्गा कला मंच (फोंडा), दामबाब सेल्फ हेल्प ग्रुप (फोंडा) आणि शर्वाणी सेल्फ हेल्प ग्रुप (साळगाव).

वेशभूषा स्पर्धा (मोठा गट) : पहिले- मदन तारी, दुसरे- अवित पेडणेकर, तिसरे- धनंजय नाईक, उत्तेजनार्थ- देवेंद्र आकारकर, संजय नाईक, शौनक गडेकर, अनुपचंद्र मडकईकर, रामा परवार, गौरेश मांद्रेकर आणि अभिषेक पार्सेकर.

Bicholim Shimgotsav Festival
Gorakhpur To Goa Train: गोरखपूर ते गोवा रेल्वे धावणार; तयारीला वेग, एप्रिलमध्ये महत्वाची बैठक

वेशभूषा मोठा (लहान गट) : पहिले- आरोही वेरेकर, दुसरे- तनुश्री वाडेकर, तिसरे- जीविका नाईक, आराध्या पागी, युक्ता परब, कृतार्थ पेडणेकर, अव्या शेट शिरोडकर, कियान बांदेकर, समृद्धी वायंगणकर आणि शर्विल पळ.

डिचोली मर्यादित वेशभूषा स्पर्धा

(मोठा गट) : पहिले- पार्थ कामत सातोस्कर, दुसरे- अवनिश राऊत, तिसरे- श्रीनुज मातोंडकर, उत्तेजनार्थ- कविश बेतकीकर, आस्था सावंत, कनिष बेतकीकर, आद्विता गोसावी, अन्वी कुडासकर, समृद्धी पार्सेकर आणि श्रावणी कळंगुटकर.

(लहान गट) - पहिले- नवेदांत मारशाले, दुसरे- परिधी वायंगणकर, तिसरे- श्रीजा पळ, उत्तेजनार्थ-तपस्या साटम, कृती कवळेकर, अलिशा तारी, अविनाश तारी, ओमश्री पालयेकर, साहस्या वायंगणकर आणि कृतार्थ पेडणेकर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com