New Year : डिचोलीत मद्यधुंद चालकांवर कारवाई; पोलिस सतर्क

New Year : नवर्ष साजरे करण्यासाठी पर्यटकांची गर्दी
New Year
New YearDainik Gomantak

New Year : डिचोली, नववर्ष साजरे करण्यासाठी कर्नाटकसह अन्य राज्यातील हजारो पर्यटक चोर्लाहून साखळी-डिचोलीमार्गे गोव्यात दाखल झाले आहेत.

नववर्ष साजरे करताना गैरप्रकार रोखण्यासाठी डिचोली पोलिसांतर्फे राज्याबाहेरुन येणाऱ्या पर्यटक वाहनांची कसून तपासणी करण्यात येत होती.

विविध ठिकाणी पोलिस राज्याबाहेरून येणारी पर्यंटक वाहने अडवून कागदपत्रांची तपासणी करीत होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पोलिसांची ही मोहीम चालू होती.

पोलिसांच्या या मोहिमेमुळे मद्याच्या नशेत वाहने चालवणाऱ्या किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्थानिक वाहनचालकांची मात्र गोची झाली होती. काही दुचाकी वाहनचालकांना तर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले.

New Year
Goa Mining News: ‘लीज’मधून मुळगावला बाहेर काढण्याचे सरकारचे प्रयत्न; आमदार डॉ. शेट्येंची माहिती

डिचोली शहरात आज सकाळपासूनच नववर्षाच्या स्वागताचा उत्साह दिसून येत होता. नववर्षाच्या स्वागतानिमित्त आज शहरातील अवरलेडी ऑफ ग्रेस चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

नववर्षाचे औचित्य साधून बहुतेक ठिकाणी तरुणाईतील गटांनी पार्ट्याचे आयोजन केले होते. युवकांचे काही गट तर नववर्षाचा आनंद लुटण्यासाठी शहराबाहेर गेले आहेत. शहरातील बहुतेक रेस्टॉरंट आज रात्री फूल्ल होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com