Bicholim News: 'कारवाईसाठी आले पण..'! डिचोली बाजारातील विक्रेत्यांना पालिकेने घातल्या अटी

Bicholim Market Road: बाजारातील रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या स्थानिक विक्रेत्यांच्या विरोधात आज (सोमवारी) डिचोली पालिकेने कारवाईचा बडगा उचलला खरा, मात्र अन्यत्र बसण्यास विक्रेत्यांनी स्पष्ट नकार दिल्याने अखेर पालिकेने माघार घेतली.
Bicholim Market: बाजारातील रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या स्थानिक विक्रेत्यांच्या विरोधात आज (सोमवारी) डिचोली पालिकेने कारवाईचा बडगा उचलला खरा, मात्र अन्यत्र बसण्यास विक्रेत्यांनी स्पष्ट नकार दिल्याने अखेर पालिकेने माघार घेतली.
Dicholi Market Dainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim Market Sellers Encroachment

डिचोली: बाजारातील रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या स्थानिक विक्रेत्यांच्या विरोधात आज (सोमवारी) डिचोली पालिकेने कारवाईचा बडगा उचलला खरा, मात्र अन्यत्र बसण्यास विक्रेत्यांनी स्पष्ट नकार दिल्याने अखेर पालिकेने माघार घेतली. वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा करू नका, या अटीवर विक्रेत्यांना पूर्वीच्याच जागेत बसण्यास पालिकेने परवानगी दिली. परंतु विक्रेत्यांविरोधात पुन्हा तक्रारी आल्यास कारवाई करण्याचा इशाराही पालिकेतर्फे यावेळी देण्यात आला.

आज सकाळी पालिकेने धडक मोहीम हाती घेताना न्यायालयाकडून बाजारापर्यंतच्या रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्या विरोधात कारवाई केली. या विक्रेत्यांना रस्त्यावरून हाकलून त्यांना गणपती पूजन मंडपात बसा, अशी तंबी पालिकेच्या बाजार निरीक्षकांनी विक्रेत्यांना दिली. विक्रेत्यांनी गणपती पूजन मंडपात आपले सामान नेले. दिवाळीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने विक्रेते अस्वस्थ बनले. काही विक्रेत्यांनी पालिका कार्यालयाला धडक दिली.

विक्रेत्यांनी बाजार निरीक्षकांची भेट घेऊन आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली. गणपती पूजन मंडपात दिवाळीचा बाजार भरत असल्याने आम्हांला जागा मिळणार नाही, असे या विक्रेत्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. अखेर कोणालाही अडथळा करू नका. या अटीवर तूर्त या विक्रेत्यांना पूर्वीच्याच जागेत बसण्यास अनुमती देण्यात आली.

Bicholim Market: बाजारातील रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या स्थानिक विक्रेत्यांच्या विरोधात आज (सोमवारी) डिचोली पालिकेने कारवाईचा बडगा उचलला खरा, मात्र अन्यत्र बसण्यास विक्रेत्यांनी स्पष्ट नकार दिल्याने अखेर पालिकेने माघार घेतली.
Assagao Crime: बोगस कागदपत्रे वापरून भूखंड विकले! ‘एसआयटी’कडून दोघांना अटक; आणखी दहा जणांविरुद्ध गुन्हे नोंद

योग्य तोडगा काढा

आमच्या विरोधात अधूनमधून कारवाई होत असते. गणपती पूजन मंडपात बसल्यास ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागते, असा बाजारातील विक्रेत्यांचा दावा आहे. आमच्या विरोधात कारवाई करण्याऐवजी गणपती पूजन मंडपात सोडून अन्यत्र सोयीस्कर अशा ठिकाणी कायमस्वरूपी जागा द्यावी, योग्य असा तोडगा काढावा, अशी मागणी या विक्रेत्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com