बंडखोरीमुळे डिचोली पालिका राजकारण वेगळ्या वळणावर

चार नगरसेवक अलिप्त : विरोधी नगरसेविका उपनगराध्यक्ष शक्य
Bicholim Municipal Council
Bicholim Municipal CouncilDainik Gomantak

डिचोली : भाजपचे वर्चस्व असलेल्या डिचोली पालिकेतील राजकारणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. गत विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करून भाजप उमेदवाराविरोधात काम केल्याचा ठपका ठेवून माजी नगराध्यक्षांसह चार नगरसेवकांना सत्ताधारी गटाने जवळपास अलिप्त ठेवले आहे. तर दुसऱ्या बाजूने बंडखोर नगरसेवकांना शह देण्यासाठी सध्या रिक्त असलेल्या उपनगराध्यक्ष पदावर विरोधी गटाच्या नगरसेविकेला बसविण्याच्या हालचाली सत्ताधारी गटाने सुरू केल्या आहेत.

(Bicholim Municipal Council Rebel)

उपनगराध्यक्ष तनुजा गावकर यांच्यासह सतीश गावकर, रियाज बेग आणि दीपा शिरगावकर या चार नगरसेवकांनी भाजप उमेदवाराविरोधात काम केल्याच्या निकर्षापर्यंत भाजप आला आहे. त्यामुळेच पालिकेतील सत्ताधारी गटाने आपल्याच गटातील बंडखोर नगरसेवकांना सध्या अलिप्त ठेवले आहे. बुधवारी (ता. 22) डिचोलीत झालेल्या वीज खात्याच्या एका कार्यक्रमावेळी त्याची झलकही दिसून आली. बंडखोरी केल्याचा संशय असलेले चारही नगरसेवक एकत्रित दिसून आले. दुसऱ्या बाजूने तनुजा गावकर यांचीही सत्ताधारी गटाने उपनगराध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली आहे.

Bicholim Municipal Council
पणजीचे माजी उपमहापौर रुद्रेश चोडणकर यांचे निधन

सुखदा तेली यांना लॉटरी

येथील उपनगराध्यक्ष पद सध्या रिक्त आहे. सत्ताधारी गटातील चार नगरसेवकांना अलिप्त केल्यानंतर सत्ताधारी गटाचे संख्याबळ सहा होते. पालिकेतील सत्ता अबाधित ठेवायची असल्यास किमान आठ नगरसेवकांची आवश्यकता आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाने दोन विरोधी नगरसेवकांना आपल्याकडे आकर्षित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

नरेश सावळ यांची महत्त्वाची भूमिका

पालिका निवडणुकीत तेली या माजी आमदार सावळ यांच्या ‘टुगेदर फॉर बिचोलीम’ या पॅनेलमधून निवडून आल्या होत्या. मात्र, आता विरोधकांना शह देण्यासाठी भाजप समर्थक गटाने तेली यांना आपल्या गोटात ओढले आहे. त्यांना उपनगराध्यक्ष पद देण्याचे निश्चित केले. विशेष म्हणजे, सावळ यांनीही त्यांना होकार दिला आहे. त्यामुळे आता सुखदा तेली यांची उपनगराध्यक्षपदी निवड होणार, हे स्पष्ट झाले आहे.

Bicholim Municipal Council
मडगावात अनोळखी व्यक्तीच्या खूनामुळे खळबळ

विधानसभेवेळी स्वकियांकडूनच घात

डिचोली पालिकेत चौदापैकी भाजप पुरस्कृत गटाचे दहा नगरसेवक निवडून आले होते. तर माजी आमदार नरेश सावळ यांच्या पॅनेलचे तीन आणि विद्यमान आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या पॅनेलचा एकमेव नगरसेवक निवडून आला आहे. पालिकेत भाजपचे निर्विवाद वर्चस्व असूनही गत विधानसभा निवडणुकीत डिचोली पालिका क्षेत्रात भाजप उमेदवाराची तिसऱ्या स्थानी घसरण झाली होती. स्वकियांनीच भाजप विरोधात काम केल्याने ही नामुष्की आली, असा भाजपचा दावा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com