Bicholim News : खाणखंदक झाले असुरक्षित; लामगावात उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष

Bicholim News : या खाणखंदकाच्या भोवतालचा मातीचा भराव खचू लागला असून भरावातून पाणी झिरपत आहे. मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली तर भराव कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे डिचोलीतील खाणक्षेत्रात भयावह स्थिती निर्माण झाली आहे.
Bicholim
Bicholim Dainik Gomantak

Bicholim News :

डिचोली, शहरानजीक असलेल्या लामगाव येथील डों गर माथ्यावरील खाणखंदक असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे.

या खाणखंदकाच्या भोवतालचा मातीचा भराव खचू लागला असून भरावातून पाणी झिरपत आहे. मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली तर भराव कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे डिचोलीतील खाणक्षेत्रात भयावह स्थिती निर्माण झाली आहे.

मोसमी पावसाळा सक्रिय झाला तरी खाणपिटातील पाणी खाली करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास प्रशासनाला अजून वेळ मिळालेला नाही. यापूर्वी डिचोलीसह मुळगाव आणि व्हाळशी भागात खाणपिटांपासून कोसळलेल्या आपत्तींमुळे जनतेची भीती अधिकच वाढली आहे.

Bicholim
Cyber Crime Goa : सायबर क्राईम ः त्रस्त गोवेकरांची कथा आणि व्यथा

धोकादायक खाणखंदक त्वरित खाली करून सुरक्षेच्या दृष्टीने खाणींवर प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, लामगाव येथील खाणखंदकावर पंपची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र सुरक्षेच्यादृष्टीने अन्य उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही, अशी माहिती काही नागरिकांनी दिली.

लामगाव येथील वेदांता (सेसा) कंपनीचे खाणखंदक पूर्ण धोकादायक बनले आहे. खाणींवर आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना करणे खाण कंपन्यांना बंधनकारक आहे. मात्र खाणींची लिजेस रद्द झाल्यानंतर मालकांनी हे काम गांभीर्याने घेतलेले नाही. डिचोली मायनिंग ब्लॉक-एक अंतर्गत येणारी डिचोलीतील खाण सुरू झाली आहे. तरीही अजून उपाययोजना करण्यात आलेली नाही

तत्पूर्वी २०११ मध्ये खाणपिटाचा भाग कोसळल्याने खाणपिटातील पाण्याचा लोट मुळगाव गावात घुसला होता. पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेलेला मुळगावमधील एक नागरिक सुदैवाने बचावला होता. या घटनेवेळी मुळगाव गावात मोठा हाहा:कार माजला होता.

तर ३५ वर्षापूर्वी व्हाळशीच्या माथ्यावर खाणपिटाची दरड कोसळून दोघा सुरक्षा रक्षकांना जीव गमवावा लागला होता. डिचोली परिसरातील या घटना पाहता, खाणखंदक स्थळी सुरक्षात्मक उपाययोजना केल्या नाहीत. तर मोठा अनर्थ ओढवण्याची भीती आहे.

Bicholim
Goa Assault Case: धारबांदोड्यात प्राणघातक हल्ला करुन एकास लुटले, दोघांविरोधात गुन्हा नोंद

२०१८ मध्ये जोरदार पावसात डिचोलीतील खाणीतील पाणी बाहेर फुटून दगड-मातीसह पाण्याचा प्रचंड लोट पाजवाड्याच्या दिशेने जुन्या बसस्थानकापर्यंत लोटला होता. काही दुकाने आणि घरांनीही पाणी घुसले होते. या घटनेवेळी शहरात आकांत पसरला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com