Bicholim Market : शिमग्याच्या साहित्याने बाजार फुलला, विक्रेत्यांना दिलासा

Bicholim Market : डिचोलीत मोदींच्या चेहऱ्याशी साम्य असलेले मुखवटेही बाजारात , उलाढाल वाढली
Bicholim Market
Bicholim Market Dainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim Market :

डिचोली, शिगमो म्हणजे रंगांची उधळण करण्याचा आणि वेगवेगळी ''सवंगे'' रंगविण्याचा असा उत्साहाचा उत्सव. सध्या डिचोलीत सर्वत्र शिमग्याचे वातावरण फुलू लागले असून, शिमग्यानिमित्त गुलाल, पिचकाऱ्या, मुखवटे आदी साहित्याने डिचोली बाजारही फुलला आहे.

या साहित्याची खरेदीही सुरू झाली आहे. यंदा बाजारात मात्र काही दुकानामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याशी साम्य असलेले मुखवटे लक्ष केंद्रित करीत आहेत.

शिमग्यानिमित्त बाजारात विविध आकाराच्या आणि वेगवेगळ्या प्रकाराच्या पिचकाऱ्या विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत. १०० रुपये ते ८५० रुपयापर्यंतच्या पिचकाऱ्या विक्रीस उपलब्ध असून, या पिचकाऱ्या लहान मुलांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Bicholim Market
Goa Shigmotsav 2024 : पणजी शहरात सोमवारपासून शिमगोत्सवाची धूम

विविध प्राण्यांच्या चेहऱ्यांशी मिळतेजुळते आणि अक्राळविक्राळ मुखवटेही बाजारात उपलब्ध झाले असून, हे मुखवटेही लक्ष वेधून घेत आहेत. ६०० रुपये किमतीपर्यंतचे मुखवटे बाजारात उपलब्ध झाले आहेत. अन्य साहित्यही बाजारात उपलब्ध असून, त्यांची खरेदीही सुरू आहे. उद्यापासून साहित्य खरेदीला जोर येण्याची शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

नैसर्गिक रंग बाजारात..!

शिगमो म्हणजे रंगांची उधळण करण्याचा उत्सव. त्यामुळे बाजारात विविध प्रकारचे रंग (गुलाल) विक्रीस उपलब्ध झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक रंगांना मागणी असल्याने यंदाही विक्रेत्यांनी नैसर्गिक रंग उपलब्ध केले आहेत.

डिचोलीतील बहुतेक सर्व भागात रंगपंचमी किंवा धुळवड साजरी करण्यात येत असल्याने रंगांना मागणी असते. त्यामुळे बाजारात लाल, पिवळा, निळा आदी विविध प्रकारचे रंग उपलब्ध झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com