Bicholim: 'माका नाका प्लास्टिक'! डिचोलीत नगरसेवकाकडून आगळ्यावेगळ्या पद्धतीने जनजागृती

Bicholim News: एका बाजूने लक्ष्मीपूजनाचा उत्साह, तर दुसऱ्या बाजूने या उत्सवाची संधी साधून डिचोलीत एका नगरसेवकाकडून बाजारात चक्क आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्लास्टिकविरोधात जनजागृती करण्यात आली.
Bicholim News: एका बाजूने लक्ष्मीपूजनाचा उत्साह, तर दुसऱ्या बाजूने या उत्सवाची संधी साधून डिचोलीत एका नगरसेवकाकडून बाजारात चक्क आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्लास्टिकविरोधात जनजागृती करण्यात आली.
Plastic Awareness CampaignDainik Gomantak
Published on
Updated on

Unique Anti-Plastic Drive in Bicholim Market

डिचोली: एका बाजूने लक्ष्मीपूजनाचा उत्साह, तर दुसऱ्या बाजूने या उत्सवाची संधी साधून डिचोलीत एका नगरसेवकाकडून बाजारात चक्क आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्लास्टिकविरोधात जनजागृती करण्यात आली.

शुक्रवारी सायंकाळपासून डिचोली शहरात सर्वत्र लक्ष्मीपूजनोत्सवाचा उत्साह संचारला होता. लक्ष्मीपूजनानिमित्त बालगोपाळ आदी बाजारात फिरून दुकाने आणि अन्य आस्थापनांनी जाऊन प्रसाद गोळा करीत होते. डिचोलीतील एक ज्येष्ठ नगरसेवक विजयकुमार नाटेकर हेही बाजारात फिरत होते. त्यांच्याबरोबर इंद्रजीत नार्वेकर आणि विराज नाटेकर हे युवकही होते.

Bicholim News: एका बाजूने लक्ष्मीपूजनाचा उत्साह, तर दुसऱ्या बाजूने या उत्सवाची संधी साधून डिचोलीत एका नगरसेवकाकडून बाजारात चक्क आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्लास्टिकविरोधात जनजागृती करण्यात आली.
Kokan Railway: ‘कोकण रेल्वे’ आता सुसाट! उन्हाळी हंगामाचे वेळापत्रक लागू; जाणून घ्या बदल

बाजारात फिरताना नगरसेवक नाटेकर प्लास्टिकविरोधात जनजागृती करत होते. ‘माका नाका प्लास्टिक’ असे म्हणत कापडी पिशवी घेऊन ते बाजारात फिरत होते. या पिशवीतून चिरमुऱ्याही गोळा करताना त्यांनी सर्वांना पर्यावरण जतनाचा संदेश दिला. प्रत्येक ठिकाणी नाटेकर यांना प्रतिसाद मिळाला. गेल्या दोन वर्षांपासून लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधून मी पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती करीत आहे. आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी शिवलेल्या कापडी पिशव्या घेऊन आम्ही फिरलो, असे विजयकुमार नाटेकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com