Babush Monserrate : कथित बलात्कारप्रकरणी सुनावणीस गैरहजर राहण्याची मुभा द्या, मोन्सेरात यांचा न्यायालयात अर्ज

कथित बलात्कारप्रकरणी जूनपासून आठवड्यातील तीन दिवस सुनावणी
Babush Monserrate |Goa News
Babush Monserrate |Goa News Dainik Gomantak
Published on
Updated on

Babush Monserrate : महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांचा कथित सहभाग असलेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणाची सुनावणी जलदगतीने घेण्याचा निर्णय खास न्यायाधीश इर्शाद आगा यांनी घेतला आहे. जूनपासून दर आठवड्याला तीन दिवस ही सुनावणी होणार आहे.

तथापि, या सुनावणीस कायमचे गैरहजर राहण्यासाठी मोन्सेरात यांनी न्यायालयात अर्ज केला असून या अर्जावर येत्या शुक्रवारी निर्णय होणार आहे. या प्रकरणात मोन्सेरात यांच्यासह अन्य एक महिला आरोपी आहे.

2016 साली मोन्सेरात यांनी एका अल्पवयीन मुलीला तिच्या आईकडून 50 लाख रुपयांना विकत घेतले होते.

Babush Monserrate |Goa News
Goa Congress : नऊ तालुक्यांत टँकर माफियांचा सुळसुळाट; काँग्रेसचा हल्लाबोल

अखेर मंत्री गुदिन्हो न्यायालयात हजर

4.52 कोटींच्या वीज बिल सवलत घोटाळाप्रकरणी मुख्य आरोपी असलेले विद्यमान पंचायतमंत्री माविन गुदिन्हो हे आज प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहिले. मागील सुनावणीवेळी खास न्यायाधीश इर्शाद आगा यांनी त्यांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्यासाठी आदेश जारी केला होता. न्या. आगा यांनी गुदिन्हो यांची हजेरी नोंद करून घेताना या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली.

वीज बिल घोटाळा सुनावणी तहकूब

हे प्रकरण 1998 सालचे आहे. त्यावेळी काँग्रेस सरकारात वीजमंत्री असलेले गुदिन्हो यांनी काही कारखान्यांना सरकारची बिल सवलत योजना संपलेली असतानाही पूर्वलक्षी प्रभावाने सवलत देत राज्याचे 4.52 कोटींचे नुकसान केल्याचा आरोप होता. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी गुदिन्हो यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com