महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या विरोधातील अल्पवयीन मुलीवर कथित बलात्कार प्रकरणाच्या खटल्याची पुढील सुनावणी येत्या बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
बुधवारी हा खटला खास न्यायालयाचे न्यायाधीश इर्शाद आगा यांच्या न्यायालयात सुनावणीस आला असता, महेंद्र भंडारी या साक्षीदाराची साक्ष नोंदवून घेण्यात आली. या प्रकरणातील एका साक्षीदाराला समन्स बजावण्यात आले. मोन्सेरात यांना या खटल्याच्या सुनावणीस कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याची मुभा आहे. अन्य एक संशयित फेर्राव याही गैरहजर होत्या.
2016 साली मे महिन्यात पणजी महिला पोलीस स्थानकात हे प्रकरण नोंद झाले होते. आमदार असलेले मोन्सेरात यांनी एका अल्पवयीन मुलीला तिच्या आईकडून 50 लाख रुपयाला विकत घेतले आणि नंतर गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्या मुलीची आई या प्रकरणात सहयोगी आरोपी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.