अयोध्या राम मंदिर प्रतिष्ठापणा! साखळीतील मंदिरांमध्ये दिवाळी साजरी होणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

साखळीतील आयोजित केलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

अयोध्या येथे साकारण्यात आलेले राम मंदिर हे राष्ट्र मंदिर असून हे मंदिर स्थापन होऊन तेथे भगवान रामाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व्हावी ही भारतातील प्रत्येक रामभक्ताची तीव्र इच्छा होती. आज तो क्षण आलेला असून मंदिर व मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा दिवसही ठरला आहे. याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आनंद व्यक्त केला. साखळीतील आयोजित केलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते.

CM Pramod Sawant
Goa Live Updates 15 January 2024: पदवीपर्यंत थांबू नका! बारावीनंतर UPSC-GPSC करून व्हा अधिकारी!

ते म्हणाले की, या दिवशी संपूर्ण राज्यातही दिवाळी साजरी व्हावी. त्यासाठीचे नियोजन आतापासूनच करायला हवे. अयोध्येतील मंदिरामुळे अयोध्या हे देशातील प्रथम क्रमांकाचे पर्यटन स्थळ होणार आहे.

22 जानेवारीला होणाऱ्या श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त साखळी मतदारसंघातील प्रत्येक पंचायतक्षेत्रात मंदिरांमध्ये कशा प्रकारे कार्यक्रम आयोजित करून दिळावी साजरी करावी, याचे नियोजन व मार्गदर्शन करण्यासाठी साखळी रवींद्र भवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी साखळी मतदारसंघातील सर्व पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य, साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, मतदारसंघातील सर्व देवस्थान समिती, मंदिरांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com