Goa Live Updates 15 January 2024
Goa Live Updates 15 January 2024Dainik Gomantak

Goa Live Updates 15 January 2024: वेदांता कंपनीने खाण खात्याचे 165 कोटी रुपये थकवले - काँग्रेस

Goa Breaking News 15 January 2024: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज....

वेदांता कंपनीने खाण खात्याचे 165 कोटी रुपये थकवले - काँग्रेस

वेदांता कंपनीने 2012 पासून खाण खात्याचे 165 कोटी रुपये थकवल्याचा आरोप आज गोवा काँग्रेसने केला. पक्षाने खाण संचालकांकडे तक्रार दाखल केली असून, एमव्ही चारिकलिया ज्युनियरचे जहाज लोड करणे थांबवावे तसेच, जहाज जप्त करून पैसे वसूल करण्याची आणि त्याचा लिलाव करण्याची मागणी केलीय.

रणजी करंडक; गोव्याला अनिर्णित लढतीत तीन गुण

रणजी करंडक क्रिकेट सामन्यात चंडीगडने फॉलोऑन टाळला. अनिर्णित लढतीत पहिल्या डावातील आघाडीचे गोव्याला तीन गुण. फिरकी गोलंदाज दर्शन मिसाळचे डावात ५ बळी.

विना तिकीट प्रवाशांकडून मागील ३ महिन्यांत कोकण रेल्वे कडून ५.६० कोटींचा दंड वसूल

कोकण रेल्वे मार्गावर सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवली जात आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ या तीन महिन्यांच्या कालावधील तिकीट तपासणीसांनी फुकट प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून ५ कोटी ६० लाख ९९ हजार १७ रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.

सिर्ली धर्मापूर येथे झालेल्या गाडीच्या अपघातात २९ वर्षीय युवकाचा मृत्यू

सिर्ली धर्मापूर येथे रविवारी रात्री कारचालकाचा रस्त्याचा अंदाज चुकल्याने भरधाव कार झाडाला आदळली. यात जखमी चालक सत्या तोमर (२९) याला इस्पितळात दाखल केले असता त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. भरधाव वेगात गाडी हाकल्याने वाहनावरील त्याचे नियंत्रण जाऊन हा अपघात घडला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

...तरच मी 2024ची निवडणूक लढवणार: चर्चिल आलेमाव

2012 मध्ये मी निवडणूक हरलो तेव्हा मी सांगितले होते की EVMमध्ये फेरफार होऊ शकतो. त्यामुळेच मी हरलो. त्यावेळी सर्वांनी माझी खिल्ली उडवली होती; पण आज माझे शब्द खरे ठरत आहेत. कारण अनेक राज्यांनी EVM रद्द करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. जर 2024 च्या निवडणुका मतपत्रिकेच्या मतदानावर घेतल्या गेल्या तर मी निवडणूक लढवणार. माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांची माहिती

उद्योगांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळासाठी अभ्यासक्रमात बदल

उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ गोव्यात उपलब्ध नाही. त्यामुळे गोव्यातील उद्योगांचा विचार करून त्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली. कॉनवर्ज 2024 कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

सूचना सेठचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला! 

चार वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणातील संशयित सूचना सेठच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ. पणजी बाल न्यायालयात झालेल्या सुनावणीत 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी वाढवण्यात आली. सेठची 6 दिवसांची पोलीस कोठडी आज पूर्ण झाली आहे.

हरेष नाईक कुर्टी खांडेपार सरपंचपदी!

कुर्टी खांडेपार पंचायतीच्या सरपंचपदी हरेष नाईक यांची बिनविरोध निवड. फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश रवी नाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले.

पदवीपर्यंत थांबू नका! बारावीनंतर UPSC-GPSC करून व्हा अधिकारी!

बारावीनंतर पदवीचे शिक्षण घेण्याचे दिवस मागे पडले. आता नोकरीसाठी बारावीनंतर युपीएससी किंवा जीपीएससी परीक्षा देऊन अधिकारी व्हा, मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मयेत खनिज वाहतूक विरोधातील धग कायम

मयेत खनिज वाहतूक विरोधातील आंदोलनाची धग कायम. पोलीस बंदोबस्तात खनिज वाहतूक. नागरिक कोणत्याही क्षणी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची शक्यता.

शिर्लीतील स्वयंअपघात एकाचा मृत्यू

मडगाव कुंकळ्ळी मार्गाजवळ शिर्ली येथे आज (15 जानेवारी) सकाळी कारचा स्वयंअपघात घडला. चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटून कार झाडावर आदळली. यामध्ये चालकाचा मृत्यू झाला आहे.

मांद्रे मतदारसंघासाठीनव्या पाणी प्रकल्पाचा शुभारंभ

मांद्रे मतदारसंघासाठी पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आमदार जीत आरोलकर यांनी तुये आयटीआय नवीन पाणी प्रकल्प चोपडे आगर वाडापर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्याचा शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पासाठी 64 कोटी खर्च करण्यात आले आहेत.

सूचनाची पुढील सुनावणी

काल (14 जानेवारी) म्हापसा कोर्टाने सूचनाला सुनावलेला सहा दिवसांचा पोलीस कोठडीचा कालावधी पूर्ण झाला. याबाबत आज बालन्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये होणाऱ्या निर्णयाकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

व्यंकटरमणची होणार डीएनए चाचणी

कांदोळी हत्याप्रकरण या प्रकरणातील महत्वाचा दुवा असलेले व्यंकटरमण यांची आज (15 जानेवारी) गोवा वैद्यकीय महाविद्यालयात डीएनए चाचणी होणार आहे. या घटनेतील कोणतीही बाब/पुरावे सुटू किंवा दुर्लक्षित होऊ नयेत यासाठी कळंगुट पोलिसांनी सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित केले असल्याचे सांगितले.

गोवा पोलीस अॅक्शन मोडमध्ये; अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी एकाला अटक

गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी पहाटे म्हापसामध्ये टाकलेल्या छाप्यात मनीष महाडेश्वर (44) याला अटक केली आणि त्याच्याकडून 55 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या छाप्यात 30 किलो गांजा आणि 5 किलो चरस जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार आणि सोबतच 50,000 रोख जप्त करण्यात आले आहे.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.37

Panjim ₹ 97.37

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 89.93

Panjim ₹ 89.93

South Goa ₹ 89.68

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com