Atal Setu Closure : अटल सेतू पुन्‍हा बंद; पणजीत पुन्हा चक्का जाम शक्य

वाहनचालकांमध्ये संतापाची लाट
Atal Setu
Atal SetuDainik Gomantak
Published on
Updated on

Atal Setu to be Closed for Repairs: राज्यात होणाऱ्या जी-20 बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर अटल सेतूची डागडुजी व डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

काम वेळेत पूर्ण होण्यासाठी हा पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्‍यामुळे वाहनचालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक बंद ठेवली जाणार असल्याने आता पुन्हा वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागून चक्का जाम होणार आहे.

हे काम कधी पूर्ण होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे पणजी-मेरशी तसेच पणजी-पर्वरी या मार्गांवर वाहतूक कोंडी निश्‍चित मानली जात आहे.

गेल्या मार्च महिन्याच्या अखेरीस अटल सेतूची डागडुजी काम तसेच डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने हा पूल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करून या पुलावरून होणारी वाहतूक दोन्ही मांडवी पुलांवरून वळविण्यात आली होती.

Atal Setu
Patra Chawl Case : पत्राचाळ प्रकरणी वाधवान बंधूंची गोव्यातील कोट्यावधींची मालमत्ता ED कडून जप्त

पर्वरीकडून पणजीकडे येणाऱ्या व मेरशीकडे जाणाऱ्या तसेच पणजीहून पर्वरी व मेरशीकडे जाणाऱ्या वाहनांच्या मोठमोठ्या रांगा सुमारे अर्धा-एक किलोमीटरपर्यंत लागत होत्या. एक आठवड्याहून अधिक काळ लोकांना या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले होते.

पर्वरीतून पणजीत येण्यासाठी अर्धा ते एक तास लागत होता. याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी अटल सेतूवरून पणजीहून पर्वरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एक लेन सुरू करण्याची सूचना केली होती.

त्यामुळे पणजी-पर्वरी ही वाहतूक कोंडी काही प्रमाणात सुटली, मात्र पर्वरीहून पणजीत येताना होणारी कोंडी कायम होती.

दरम्‍यान, अटल सेतूवरील एक लेन सुरू केल्‍याने डागडुजी व डांबरीकरणाच्‍या कामात अडथळे येत आहेत. या कामासाठी आणलेल्या काही यंत्रांमध्येही वारंवार बिघाड होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी डांबरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. हे काम वेळेत होण्याची शक्यता नसल्याने अटल सेतू बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

Atal Setu
Virdi Dam Dispute : विर्डी धरणाचे काम थांबवा; गोव्‍याची महाराष्ट्राला नोटीस

परीक्षार्थींना फटका!

विधानसभा अधिवेशन सुरू असताना सरकारने वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी काही काळ अटल सेतूवरील एक लेन सुरू ठेवली. मात्र आता विधानसभा संपल्यावर ती पुन्हा बंद केल्याने वाहनचालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सध्या राज्यात दहावीची परीक्षा सुरू आहे. या वाहतुकीच्या कोंडीचा फटका परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बसू शकतो. विचार न करताच सरकार निर्णय बदलत आहे.

येथे होऊ शकते वाहतूक कोंडी

  • पणजी-पर्वरी मार्ग

  • पणजी-मेरशी मार्ग

  • पणजी कदंब बसस्‍थानक

  • पणजी दिवजा सर्कल

  • मेरशी सर्कल जंक्शन

  • पर्वरी सर्कल जंक्शन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com