One Lane of Atal Setu Bridge Opened: दुरुस्तीच्या कामासाठी गेल्या अनेक दिवसांपासून बंद ठेवलेला राष्ट्रीय महामार्गावरील अटलसेतू आज अंशतः खुला केल्याने वाहनधारकांनी काहीसा सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
राज्य सरकारने या अगोदर जाहीर केल्याप्रमाणे आज सकाळी 9 वाजल्यापासून पर्वरीकडून फोंडा आणि मडगावकडे जाणारी एकेरी वाहतूक खुली करण्यात आली आहे.त्यामुळे प्रवाशांना काहीसा साथ दिलासा मिळाला आहे.
सध्या पणजी शहरामध्ये स्मार्ट सिटी आणि जी २० साठीची रस्त्याच्या बांधकामाची कामे सोडत कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. बहुतांश रस्ते खोदले आहेत.
यामुळे अगोदरच वाहतूक कोंडीने पणजीकर त्रस्त असताना शहराला जोडणाऱ्या मांडवी नदीवरील अटल सेतूच्या दुरुस्तीचे काम राज्य सरकारच्या साधनसुविधा विकास महामंडळाच्या सूचनेनुसार एल अँड टी कंपनीने सुरू केले आहे.
यासाठी अटल सेतू वरील दोन्हीकडून वाहतूक बंद ठेवण्यात आली. हे काम पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे असल्याने वाहतूक बंद करण्याशिवाय कंत्राटदारापुढे पर्याय नव्हता. म्हणूनच राज्य सरकारच्या सहकार्याने दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद केली. याचा फटका वाहनधारकांना बसला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.