काणकोण: काणकोणच्या ग्रामीण भागातील बहुतांश अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे तर उर्वरित रस्त्यांचे डांबरीकरण पावसाळ्यानंतर करण्यात येणार असल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी पैंगीण पंचायत क्षेत्रातील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ केल्यानंतर सांगितले. पैंगीण पंचायत क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण 2 कोटी 56 लाख रूपये खर्चून करण्यात येणार आहे.
निवडून आल्यानंतर व मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाममंत्री व अन्य मंत्र्याची बैठक घेऊन पावसाळ्यापूर्वी जी विकासकामे करणे गरजेचे आहे त्याला प्राधान्य दिले आहे.
त्यामुळे सरकारची संवेदनशीलता दिसून येत असल्याचे सांगितले. मंगळवारी पाळोळे येथील काही रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरूवात करण्यात येणार आहे. त्याशिवाय गावडोंगरी पंचायत क्षेत्रातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.पालिका क्षेत्रातील काही रस्त्याचे डांबरीकरण पावसाळा संपल्यानंतर पूर्ण सोपस्कार करून करण्यात येणार आहे. केंद्रीय आपत्कालीन यंत्रणेअंतर्गत उभारलेल्या निवाऱ्यांचे व संस्कृती भवनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. रवींद्र भवनाचे काम जलदगतीने होत आहे.
डिसेंबरपर्यंत स्ट्रक्चरल काम पूर्ण होऊन वर्षभरात रवींद्र भवन वापरण्यास मिळणार असल्याचे तवडकर यांनी सांगितले.यावेळी भाजप मंडल अध्यक्ष विशाल देसाई, द. गोवा उपाध्यक्ष महेश नाईक, संजू तिळवे, विनय तुबकी, डॉ. पुष्पा अय्या, संदेश पैंगीणकर, शामकांत पैंगीणकर, पंच दीक्षा पागी, सरिता पागी आणि मान्यवर उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.