Ferryboat Rate : चोडणचा पूल बांधेपर्यंत फेरीबोट दरवाढ करू नये

जाहीर सभेत मागणी : ‘चोडणकाराचो आवाज’चा पुढाकार
Ferryboat Rate
Ferryboat Rate Dainik Gomantak

Ferryboat Rate : तिसवाडी, सरकारने जाहीर केलेले फेरीबोट दरवाढीचे परिपत्रक त्वरित मागे घ्यावे. चोडणचा पूल बांधेपर्यंत यात कोणतीही दरवाढ करू नये, असा एकमुखी निर्णय बुधवारी (ता.८) झालेल्या चोडणच्या जाहीर सभेत घेण्यात आला.

बुधवारी संध्याकाळी चोडण फेरीधक्क्यावर ‘चोडणकाराचो आवाज’ या संघटनेतर्फे आयोजित सभेत फेरीबोट दरवाढ करण्यात आलेल्या या परिपत्रकाविरुध्द लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी सभेत ४०० हून अधिक लोक सहभागी झाले होते.

शंकर पोळजी, प्रतिमा कुतिन्हो, रामा काणकोणकर, श्रीकृष्ण परब, संतोषकुमार सावंत, राजेश कळंगुटकर व अनिल नाईक या चोडणबाहेरील समाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी चोडणच्या या जाहीर सभेला आपला पाठिंबा दर्शविताना सरकारने ही दरवाढ लोकांना विश्वासात न घेता केली असल्याचा आरोप केला.

Ferryboat Rate
Goa Electric Solar Ferry: उंदिर कुडतरताहेत गोव्यातील एकमेव इलेक्ट्रिक सोलर फेरी बोट

सरकारच्या या दरवाढीविरुद्ध आपला निषेध व रोष व्यक्त करण्यासाठी चोडणचे सरपंच रवींद्र किनळकर यांनी या सरकारी दरवाढीबद्दल निषेध व्यक्त करून पंचायतीचा पूर्ण पाठिंबा या संघटनेला आहे.

चोडणचा पूल बांधेपर्यंत या फेरीबोट दरवाढ करू नये, अशी भूमिका मांडली. त्यामुळे चोडणकाराचो आवाज व पंचायतीच्या भूमिकेत एकमत झाल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले.

जाहिर सभा असल्याने बुधवारी संध्याकाळी फेरीच्या वाहतुकीत मोठाच फरक दिसला. दोन-दोन फेरीबोटी एकाच वेळी धक्क्यावर दिसू लागल्या. चपळाईने फेरीबोटी वाहतूक करत असल्याने प्रथमच दोन्ही धक्क्यांवर एकही वाहन रांगेत दिसत नव्हते. एरव्ही यावेळी दोन्ही बाजूकडे मोठ्या रांगा दिसतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com