Amazing Goa: राज्यातील लघु उद्योगांना मिळणार चालना; ‘अमेझिंग गोवा’मध्ये ‘लघु उद्योग भारती’चे दालन

Small Businesses: गोव्यातील लघु उद्योगांना चालना देण्यासाठी अमेझिंग गोवामध्ये केंद्र सरकार पुरस्कृत लघु उद्योग भारतीचे एक दालन उभारण्यात आले आहे.
Amazing Goa: राज्यातील लघु उद्योगांना मिळणार चालना; ‘अमेझिंग गोवा’मध्ये ‘लघु उद्योग भारती’चे दालन
Amazing GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील लघु उद्योगांना चालना देण्यासाठी अमेझिंग गोवामध्ये केंद्र सरकार पुरस्कृत लघु उद्योग भारतीचे एक दालन उभारण्यात आले आहे. लघु उद्योग भारतीतर्फे व्यावसायिकांना योग्य मार्गदर्शन केले जाते. हे मार्गदर्शन तज्ज्ञांमार्फत दिले जात असल्याची माहिती ‘लघु उद्योग भारती, गोवा’च्या अध्यक्ष पल्लवी साळगावकर यांनी दिली.

साळगावकर म्हणाल्या की, मी नुकतेच अध्यक्षपद स्वीकारले आहे आणि त्यानंतरचा हा पहिलाच उपक्रम आहे. आम्ही उद्योग भारतीतर्फे आजपर्यंत 100 हून अधिक व्यावसायिक सदस्य स्वरुपात जोडले आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांना लाभ मिळवून देण्यात आम्ही मदत करतो.

Amazing Goa: राज्यातील लघु उद्योगांना मिळणार चालना; ‘अमेझिंग गोवा’मध्ये ‘लघु उद्योग भारती’चे दालन
Amazing Goa: गोव्यातील 23 औद्योगिक क्षेत्रांत गुंतवणुकीची मोठी संधी; जागतिक परिषदेत सरकारने मांडला प्लान

लघु उद्योग भारती हा 1991 पासून भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची एक नोंदणीकृत अखिल भारतीय संघटना आहे. 2023 मध्ये राजकुमार कामत यांच्या नेतृत्वाखाली गोव्यातही लघु उद्योग भारती स्थापित झाली. वक्ते सीए महेश्वर मराठे यांनी ‘एमएसएमई साठी नवीन युग प्रोत्साहन’ या विषयावर आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ अभय बी. फुलके यांनी ‘कचरा संपत्तीत : भारताच्या जैव अर्थव्यवस्थेला रूपांतरित करण्यासाठी संशोधन आणि विकासातील नवकल्पना’ वर मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे उद्योग मंत्री मॉविन गुदिन्हो व सुरेश प्रभू यांनी या आयोजनाबद्दल लघु उद्योग भारती संस्थेचे अभिनंदन केले.

Amazing Goa: राज्यातील लघु उद्योगांना मिळणार चालना; ‘अमेझिंग गोवा’मध्ये ‘लघु उद्योग भारती’चे दालन
Amazing Goa: 'अच्छे दिन' येणार; गोव्यात होणार 'Mini Silicon Valley', केंद्रीय मंत्र्यांची घोषणा

एनबीबीसी,एमपीटी, जीएसएल आणि ओएनजीसी प्रमुखांतर्फे विक्रेता विकास कार्यक्रम झाला. स्टार्टअप गटात लिट एअरचे रोहन नाडकर्णी, सचिन शहा यांना तर स्केल अप गटात झांट्ये कॅश्‍यूनटचे प्रवीण, सिध्दार्थ आणि रोहित झांट्ये यांना आणि महिला एमएसई गटात स्नेहा भागवत यांना पुरस्कार देण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com