राज्यात 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. राज्यपातळीवर साजरा केल्या जाणाऱ्या या उत्सवात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह विविध खात्याचे मंत्री आणि आमदारांनी सहभाग घेतला.
शिवजयंतीच्या विविध कार्यक्रमात हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी हिरहिरीने सहभाग घेतला. 'छत्रपती शिवराय माझे हिरो आहेत, त्यांच्यावरील अनेक मराठी पुस्तकं मी वाचलीत,' असे फेरेरा म्हणाले.
'लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांना मी हिरो मानत आलोय, छत्रपतींनी ब्रिटिश आणि इतर देशविरोधी शक्तींविरोधात मोठा लढा दिला. देशाचे रक्षण करणारे छत्रपती आपले हिरो आहेत.'
'मी शाळेत असताना मराठीतून शिक्षण घेतले, छत्रपतींवरील अनेक मराठी पुस्तकं मी वाचलीत. लहानपणापासून मी त्यांची पूजा केलीय. आपण अशा राष्ट्रीय महापुरुषांचे विचार आणि वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे,' असे फेरेरा म्हणाले.
आमदार कार्लुस फेरेरा यांनी राज्यात शिवजयंतीनिमित्त विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला.
पर्वरीतील ‘मॉल द गोवा’च्या मागील जागेत उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरणप्रसंगी फेरेरा यांनी उपस्छिती लावली होती. पर्वरीत उभारण्यात आलेला शिवरायांचा हा पुतळा राज्यातील सर्वात मोठा पुतळा असून, त्यांची उंची 21 फूट एवढी आहे.
शिवजयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह खासदार सदानंद शेट तानावडे, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.