Airport Usage Charges : विमानतळ वापर शुल्‍क समान हवे: विजय सरदेसाई

Airport Usage Charges : खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचा दावा दिशाभूल करणारा
Vijai Sardesai
Vijai SardesaiDainik Gomantak

Airport Usage Charges :

मडगाव, दाबोळी विमानतळ बंदीच्‍या खाईत क्रॅश करण्‍यामध्‍ये मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत आणि वाहतूक मंत्री माविन गुदिन्‍हो हे पायलट आणि सहाय्‍यक पायलट आहेत.

तर त्‍यांच्‍याच म्‍हणण्‍याची री ओढत दाबोळी कुठल्‍याही प्रकारे बंद होणार नाही असा दावा करणारे काँग्रेसचे खासदार फ्रान्‍सिस सार्दिन हेही या कारस्‍थानातील सहपायलट आहेत, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केला.

सावंत आणि गुदिन्‍हो हे दाबोळी विमानतळावर ८०० कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे खर्च केल्‍यामुळे तो बंद पडणार नाही असा दावा करतात. तर सार्दिन यांनीही या विमानतळाच्‍या विस्‍तारासाठी आपण काँग्रेस सरकारकडून ६०० कोटी रुपये आणले आणि आता भाजप सरकारने त्‍यावर आणखी २०० कोटी रुपये खर्च केले आहेत.

Vijai Sardesai
Goa Daily News Wrap: गोव्यात दिवसभरात घडलेल्या ठळक आणि महत्वाच्या घडामोडींचा आढावा, एका क्लिकवर

भाजपच्‍या दाव्‍याला सार्दिन हेही पाठिंबा देत असतील तर दाबोळीचा गळा घोटण्‍याच्‍या कारस्‍थानात सार्दिन यांचाही हात असावा हा संशय येतो असे सरदेसाई म्‍हणाले. गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात बोलताना सरदेसाई यांनी हा आरोप केला. ही मुलाखत सुशांत कुंकळयेकर यांनी घेतली आहे.

दाबोळीच्या शुल्‍कात चारपटीने तफावत

सरदेसाई म्‍हणाले की, मोपा आणि दाबोळीच्‍या विमानतळ वापर शुल्‍कात चारपटीने तफावत आहे. त्‍यामुळे दाबोळी विमानतळावरील तिकीट मोपापेक्षा तीन ते चार हजार रुपयांनी अधिक आहे. असे जर असेल तर कुठलाही प्रवासी चार हजार रुपये अधिक भरून दाबोळीवर का उतरणार असा सवाल सरदेसाई यांनी केला.

दाबोळी राखायचा असेल तर दोन्‍ही विमानतळावरील वापर शुल्‍क समान पातळीवर आणण्‍याची गरज आहे. यावर मी विधानसभेत आवाज उठविला असता मुख्‍यमंत्र्यांनी यासाठी आपण प्रयत्‍न करणार असे सांगितले होते. पण दुर्दैवाने ते प्रयत्‍न झालेले दिसत नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com