Cancer News : पणजी, कर्करोग ग्रस्तांना मृत्यूपासून दूर करण्यासाठी तसेच संपूर्ण राज्यासाठी आरोग्य सेवा प्रवेश मॉडेल्सच्या प्रचारासाठी राज्य सरकारने ‘ॲस्ट्राझेनेका इंडिया’सोबत भागीदारीसाठी सामंजस्य करार केला.
आरोग्य मंत्री विश्वजित राणे, आरोग्य संचालक डॉ. गीता काकोडकर, आरोग्य सचिव तसेच ॲस्ट्राझेनेका इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष डॉ. संजीव पांचाळ व इतर सदस्यांच्या उपस्थितीत बुधवारी हा करार करण्यात आला.
अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित उपयोजनेद्वारे फुप्फुसाच्या कर्करोगाचा शोध घेणे, हे या मागचे उद्दिष्ट आहे. क्यूरे आयद्वारे विकसित स्क्रिनिंग तंत्रज्ञान या महत्त्वाच्या उपक्रमामुळे राज्यातील रुग्णालयांमधील रुग्णांना मोठ्या संख्येने फायदा होणार आहे.
राज्यात दरवर्षी अंदाजे १४०० ते १५०० नवीन कॅन्सरची प्रकरणे समोर येतात. या भागीदारीमुळे आरोग्य सेवा परिणाम वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. स्तन कर्करोगावर महागडे इंजेक्शन मोफत देणारे गोवा हे देशातील पहिले राज्य असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. जागतिक कॅन्सर दिनानिमित्त रविवारी इंजेक्शनचा पहिला लाभ देण्यात आला.
कर्करोग निदानासाठी महत्त्वपूर्ण : पांचाळ
ॲस्ट्राझेनेका इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष डॉ. संजीव पांचाळ म्हणाले, ''ॲस्ट्राझेनेका आरोग्य सेवाप्रणाली अधिक सुलभ बनवणे यावर लक्ष केंद्रित करीत आहोत. गोवा सरकारसोबतची ही भागीदारी ही एक चांगली संधी आहे.
छातीचा एक्स-रे आणि कमी डोस सिटी तंत्रज्ञान एकत्रित करून कर्करोगाच्या सुरुवातीच्या निदानासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
ज्यामुळे रुग्णांवर परिणाम कमी होतात. या आधुनिक साधनांचा वापर केवळ लवकर आजार निदान नाही, तर गंभीर आरोग्य सेवा कार्यक्रमांसाठी मौल्यवान डेटा उपलब्ध करण्यासही योगदान देतो.
तंत्रज्ञानाचा लाभ; पहिले पाऊल !
आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले, आरोग्य सेवेमध्ये परिवर्तन आणि नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्याचा आमच्या प्रयत्न आहे. ॲस्ट्राझेनेका इंडियासोबतच्या सहकार्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
विशेषतः फुप्फुसाच्या कर्करोगाच्या लवकर निदानासाठी स्क्रिनिग भागीदारीमार्फत लोकांपर्यंत सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवा आणण्याचा दृष्टिकोन आहे. यामुळे राज्याच्या आरोग्य सेवेत आणखी भर पडली आहे,असेही ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.