Accidents At Goa
पणजी: राज्यात अपघातांचे सत्र सुरूच असून शुक्रवारी चार ठिकाणी झालेल्या अपघातांत मिळून सातजण जखमी झाले. जुन्या मांडवी पुलावरील अपघातात दोघे, वेर्ला-काणकातील अपघातात दोघे, हणजूणमधील अपघातात एकजण आणि दवर्लीतील अपघातात दोघेजण जखमी झाले.
दरम्यान, जुन्या मांडवी पुलावर शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास जीप चालकाने ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असून जीप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पणजी पोलिसांनी दिली.
जीपचा चालक नेपाळी पर्यटकाने भाडेपट्टीवर जीप घेतली होती. तो गुरुवारी रात्री कॅसिनोवर मैत्रिणीसह गेला होता. शुक्रवारी सकाळी मिरामार येथील समुद्रकिनाऱ्यावरून हडफडे येथे जीपने जात होता. जुन्या मांडवी पुलावर पोहोचला असता ओव्हरटेक करून पुढे जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे त्यावरील दोन्ही स्वार जखमी झाले.
या दुचाकीच्या मागे असलेल्या दुचाकीने मागून धडक दिली व त्यामागे कारने या दुचाकीला दिली. या अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. पर्वरीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची रांग लागली होती. त्यामुळे या जुन्या पुलावरील वाहतूक नव्या पुलावरून वळविली.
जीप चालकाची रक्त चाचणी करण्यासाठी त्याला म्हापसा इस्पितळात नेण्यात आले असून त्याचा अहवाल प्रलंबित आहे. मात्र, अपघाताच्या ठिकाणी जमलेल्या लोकांनी चालक मद्याच्या नशेत होता, असा दावा केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. जखमी झालेल्या दुचाकीस्वारांची स्थिती सुधारत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
१) वेर्ला येथे २ वर्षांच्या मुलीला डोस देऊन घरी परतणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला रेन्ट अ कॅबच्या जीप गाडीने विरोधी दिशेने जाऊन ठोकर दिली. या अपघातात ब्रिटोवाडा येथील हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. हा अपघात शुक्रवारी सकाळी ९.३० वा.च्या सुमारास वेर्ला-काणका पंचायत घराजवळ घडला. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी जीप चालक मनीष दर्ग (उत्तर प्रदेश) या पर्यटकाविरुध्द गुन्हा नोंद केला आहे.
२) दरम्यान, हणजूण येथे आसाममधील पर्यटक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने, त्याने पोलिसांच्या गाडीला धडक दिली. परिणामी, पर्यटकाच्या गाडीचे चाक रस्त्याबाजूला असलेल्या गटारात गेले.
दवर्ली येथे गुरुवारी रात्री दोन दुचकींमध्ये झालेल्या एका अपघातात दोघेजण जखमी झाले. नेसाय येथील बाबुलाल साेनक (६५) या जखमीला बांबोळी येथील सरकारी इस्पितळात तर अरान शेख (१९) जखमी चालकाला मडगावच्या जिल्हा इस्पितळात दाखल केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.