Goa CM On AAP: 'गोव्यातील आप नेते घाबरलेत, आता माझं ट्रॅकिंग करतायेत'; CM प्रमोद सावंत

Goa CM On AAP: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील राज्यातील आप नेत्यांवर निशाना साधत, राज्यातील नेते घाबरल्याचे वक्तव्य केले.
Goa CM On AAP
Goa CM On AAPDainik Gomantak

Goa CM On AAP

दिल्लीच्या कथित अबकारी घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अटेकत आहेत. मद्य घोटाळ्याचा पैसा गोवा विधानसभेच्या निवडणुकीत वापरल्याचा आरोप ईडीने केला आहे.

यावरुन आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील राज्यातील आप नेत्यांवर निशाना साधत, राज्यातील नेते घाबरल्याचे वक्तव्य केले. तसेच, आप आता त्यांचे देखील ट्रॅकिंग करत असल्याचा आरोप केला.

कथित मद्य घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत. गोव्यातील आप नेते देखील घाबरलेत. मद्य घोटाळ्यातील पैसा गोवा विधानसभा निवडणुकीसाठी देखील पाठविण्यात आला. आता आप माझे देखील ट्रॅकिंग करत आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

मुख्यमंत्री सावंत यांच्या आरोपांना बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी कोणताच आप नेता घाबरला नसल्याचे स्पष्ट केले. कोणताही आप नेता घाबरलेला नाही तसेच, तुमचे ट्रॅकिंग देखील करत नाहीए. देशाचे नागरिक भाजपची मनी ट्रेल ट्रॅक करतायेत, अशा शब्दात व्हिएगस यांनी मुख्यमंत्री सावंत यांना उत्तर दिले.

Goa CM On AAP
Goa Congress: गुढीपाडव्यानंतरचे दिवस काँग्रेससाठी चांगले असतील; कधी होणार उमेदवारांची घोषणा, भिके म्हणाले...

मंगळवारी आप नेते संजय सिंह यांना जामीन मिळाला. याबाबत प्रतिक्रिया देताना मोदी नेतृत्वातील भाजप सरकार राजकीय फायद्यासाठी पीएमएलए कायद्याचा गैरवापर करत असल्याचा आरोप, व्हिएगस यांनी केला. आपला संपविण्यासाठीचा भाजप - ईडी कट आता अयशस्वी व्हायला लागलाय, असेही व्हिएगस यावेळी म्हणाले.

दरम्यान, भाजपच्या पहिला टप्पा पूर्ण झाला तरी अद्याप काँग्रेसचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, इंडिया आघाडीने देखील प्रचाराला सुरुवात केलीय. कोणीही उमेदवार असो आम्ही स्वीकारु. उमेदवार मते खेचून आणणारा प्रभावी चेहरा असावा असेही, व्हिएगस यावेळी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com