Goa Politics: ‘आप’-काँग्रेसचे संयुक्त रणनीतीवर एकमत

Goa Politics: सडेतोड नायक: मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानामुळे चर्चेला उधाण
Goa Politics:
Goa Politics:Dainik Gomantak

Goa Politics: आम आदमी पक्षाने (आप) लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण गोवा उमेदवार जाहीर केला तरी चर्चेतून ही कोंडी संपवावी व त्यासाठी दोघांनी संयुक्त रणनीती आखावी, असा सूर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांच्यात झालेल्या चर्चेतून निघाला.

संपादक-संचालक राजू नायक यांनी मंगळवारी सायंकाळी ‘गोमन्तक टीव्ही’वर ‘सडेतोड नायक'' या कार्यक्रमात पाटकर आणि पालेकर यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी ‘आप’च्या उमेदवार घोषणेवरून ‘इंडिया आघाडी’ तुटली असे विधान केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

‘आप’ने पक्षाचा उमेदवार दिला आहे, तो उमेदवार आमदार आहे. कॅप्टन असताना त्यांनी समाजसेवा म्हणून नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला. स्वच्छ चारित्र्याचा तो आमदार आहे, हे सर्व गोव्याला माहीत आहे, त्यामुळे व्हेन्झी यांना उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. पुढे ‘इंडिया’ आघाडीचा काय निर्णय होईल तो होईल.

Goa Politics:
Goa Crime News: मोर्लेत साडेचार वर्षांच्या बालिकेचे अपहरण करून ठार मारण्याचा प्रयत्न!

‘इंडिया’ आघाडीविषयी काहीही संभ्रम नाही. आम्ही संयुक्त बैठका घेतल्या, परंतु त्या सोशल मीडियावर टाकत नाही,असे पालेकर म्हणाले.

उमेदवार जाहीर करणे रणनीतीचा भाग: पालेकर

‘आप’च्या प्रदेश समितीने हा उमेदवार जाहीर केलेला नाही. केंद्रातील समितीने तो जाहीर केला आहे. तो निर्णय पक्षीय रणनीतीचा भाग असू शकतो, त्यात गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी तोंड खुपसायची गरज नाही. ‘इंडिया’ आघाडी तुटल्याचे बोलण्याचा अधिकार त्यांना नाही, तो सांगण्याचा अधिकार आमचा आहे.

Goa Politics:
Goa Political News: विकासकामांचे रिपोर्ट कार्ड द्या!

उमेदवार जाहीर करण्यामागे काही कारणे आहेत. आम्ही गोव्यात एकत्र आहोत, भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत आणि यापुढेही राहणार आहोत. देशाच्या हिताकरिता आणि भ्रष्ट भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी आम्ही एकत्र काम करणार आहोत. खरे तर मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या घरात काय चालले आहे, ते पाहणे अधिक संयुक्तिक ठरेल, असे पालेकर म्हणाले.

काँग्रेसचा दोन्ही जागांवरील दावा कायम: पाटकर

काँग्रेसने अजूनही आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. पक्षाच्या धोरणानुसार इच्छुक उमेदवारांची यादी छाननी समितीकडे पाठविली आहे. भाजपची नीती ही मते फोडून राजकारण करण्याची आहे. विधानसभेवेळी त्यांनी मते फोडण्याचेच काम केले. ‘आप’ने जाहीर केलेला उमेदवार इंडिया आघाडीचा नाही. उमेदवार जाहीर करण्याबाबत ‘इंडिया’ आघाडीची विविध पातळीवर चर्चा सुरू आहे. पक्षाचे वरिष्ठ बैठक घेतील त्यातून उमेदवार निवड जाहीर होईल. ‘आप’चा उमेदवार जाहीर झाल्यानंतर दक्षिण गोवा खासदारांनी जे मत व्यक्त केले आहे, ते त्यांचे वैयक्तिक मत आहे, ते पक्षाचे मत नाही. राष्ट्रीय स्तरावर आघाडीची तयारी सुरू आहे, असे अमित पाटकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com