Fatorda Stadium: फातोर्ड्यातील फुटबॉल स्टँडला मोन्तेक्रूझचे नाव!!

Fatorda Football Stadium: फुटबॉल स्टेडीयमच्या एका स्टॅन्डला फ्रान्सिस्को मोन्तेक्रूझ यांचे नाव
Fatorda Football Stadium: फुटबॉल स्टेडीयमच्या एका स्टॅन्डला फ्रान्सिस्को मोन्तेक्रूझ यांचे नाव
Fatorda Football Stadium Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: फातोर्ड्यातील प्रसिद्ध फुटबॉल स्टेडीयमच्या एका स्टॅन्डला माजी क्रीडा मंत्री फ्रान्सिस्को मोन्तेक्रूझ यांचे नाव देण्यात येईलअशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

वर्ष १९८९ मध्ये गोव्यात आंतरराष्ट्रीय नेहरू कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करता यावे म्हणून मोन्तेक्रूझ यांनी आठ महिन्यापेक्षाही कमी कालावधीत फुटबॉल स्टेडियमची निर्मिती केली होती.

गेल्या महिन्यात वयाच्या ७९ व्या वर्षी मोन्तेक्रूझ यांचे निधन झाले असून त्यांचे योगदान लक्ष्यात ठेवत मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

"मोन्तेक्रूझ यांचे स्टेडियम बांधणीत महत्वाचे योगदान होते. स्टेडियममधील एका स्टॅन्डला त्यांचे नाव दिले जाईल." असे वचन मुख्यमंत्री सावंत यांनी भाऊसाहेब बांदोडकर स्मृती करंडकच्या बक्षीस वितरणाच्या वेळी फुटबॉल प्रेमींना दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com