सहा महिन्याच्या तान्ह्या बाळाचा मृत्यू, बापाचा जीवन संपवण्याचं प्रयत्न; सुरक्षारक्षकानं दिलं जीवदान!

सहा महिन्याच्या बालकावर उपचार सुरू असताना झालेल्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने पित्याने या इस्पितळाच्या इमारतीतून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला.
सहा महिन्याच्या तान्ह्या बाळाचा मृत्यू, बापाचा जीवन संपवण्याचं प्रयत्न; सुरक्षारक्षकानं दिलं जीवदान!
A six-month-old child died during treatment in a hospital in Bambolim the father attempted suicideDainik Gomantak
Published on
Updated on

बांबोळी येथील सुपर स्पेशालिटी ब्लॉक इस्पितळात सहा महिन्याच्या बालकावर उपचार सुरू असताना झालेल्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने पित्याने या इस्पितळाच्या इमारतीतून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला. तेथे सतर्क असलेल्या सुरक्षारक्षकांनी त्याला अडवल्याने आत्महत्येचा प्रयत्न फसला. ही घटना काल रात्री १० च्या सुमारास घडली. याप्रकरणी आगशी पोलिसांत कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

कर्नाटक येथील कुटुंबाचे सहा महिन्याचे बालक सुपस स्पेशालिटी ब्लॉक इस्पितळात उपचार घेत होते. त्याची प्रकृती ढासळल्याने त्याच्यावर या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. ही माहिती डॉक्टरांनी बालकाच्या पालकांना दिली. ही माहिती ऐकून बालकाच्या पित्याने आत्महत्या करण्यासाठी इमारतीच्या सातव्या मजल्यावर धाव घेतली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या सुरक्षारक्षकांनीही प्रसंगावधान पाहून त्याच्या पाठोपाठ धाव घेतली. तो सातव्या मजल्यावर पोचून उडी मारण्याच्या प्रयत्नात असताना दोघा सुरक्षारक्षकांनी त्याला पकडले.

सहा महिन्याच्या तान्ह्या बाळाचा मृत्यू, बापाचा जीवन संपवण्याचं प्रयत्न; सुरक्षारक्षकानं दिलं जीवदान!
प्रेमात दुरावा निर्माण झाल्यामुळे मैत्रिणीला ठार मारून त्यानेही संपवले जीवन

यासंदर्भात आगशी पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक अनंत गावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या घटनेसंदर्भात पोलिस स्थानकाला किंवा गोमेकॉ इस्पितळात असलेल्या जीएमसी पोलिस चौकीला कोणतीही माहिती दिलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com