Goa Crime News: ताळगावात कार चोरीप्रकरणी रत्नागिरीतील एकाला अटक

त्याच्याकडून चोरलेली कारही जप्त करण्यात आली आहे
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak

Goa Crime News: राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढत चालले आहेत. ताळगाव कम्युनिटी सेंटरजवळील मोकळ्या जागेतून पार्क केलेली कार चोरल्याप्रकरणी रत्नागिरीतील एका 32 वर्षीय व्यक्तीला पणजी पोलिसांनी अटक केली.

राज सुहेद्रे असे आरोपीचे नाव असून तो मूळचा रत्नागिरी, सिंधुदुर्गचा आहे. तो सध्या ताळगाव येथे राहतो. त्याच्याकडून चोरलेली कारही जप्त करण्यात आली आहे.

Goa Crime News
Goa Petrol-Diesel Price: लॉंग ड्राईव्हला जाण्याचा विचार करताय? मग जाणून घ्या गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

लार्सन फर्नांडिस याने याबाबत पोलिसात तक्रार दिली होती. ताळगाव कम्युनिटी सेंटरजवळील मोकळ्या जागेत त्यांनी रात्री 10.15 च्या सुमारास कार पार्क केली होती. मात्र शुक्रवारी दुपारी जेव्हा ते आपल्या कारपाशी आले तेव्हा तिथे कार नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारचा माग काढला आणि कारसह चोरट्याला पकडले आहे. दरम्यान, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com