Cuncolim: दिड लाखांची दारु लंपास; चिंबल येथील एकाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

संशयित मुळ कर्नाटकातील असल्याचं स्पष्ट
stealing liquor
stealing liquor Dainik Gomantak
Published on
Updated on

गोवा राज्यात दिवसेंदिवस मारामारी, चोरी, दरोड, हल्ला, अशा गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याची तक्रार गोमंतकीय नागरीक अनेक दिवसांपासून करत आहेत. या पार्श्वभूमीवर कुंकळ्ळी येथील बारमधून सुमारे दिड लाखाची दारुची चोरी झाली असल्याची तक्रार कुंकळ्ळी पोलिसांत दाखल झाली आहे. यावरुन आज चिंबल येथील एकाला अटक करण्यात आली आहे. (A man from Karwar arrested for stealing liquor worth Rs 130000 from Cuncolim restaurant )

stealing liquor
Goa Winter Session: जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास सरकार घाबरते का? आमदार फेरेरांनी सोडले टिकास्त्र

सविस्तर वृत्त असे की, कुंकळ्ळी पोलिसांत कुंकळ्ळी येथील एका बार अँन्ड रेस्टॉरंटमधून 1,30,000 रुपयाची दारु अज्ञात चोरट्यांनी दारु लंपास केली आहे. अशी तक्रार दाखल झाली होती. यावरुन पोलिसांनी सिसीटीव्हीचा आधार घेत तपास करत आज नासिर इरफान मदनोली ( 41 वर्षे, रा. चिंबल ) मुळ धारवाड, कर्नाटक येथील एकाला अटक केली आहे.

stealing liquor
Goa Mining : राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी खनिज व्यवसाय महत्त्वाचा; भाजपचा दावा

कारवाई वेळी पोलिसांनी 1,30,000 चा दारुसाठा जप्त केला असून एकाला अटक केली आहे. पोलिसांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, या चोरीत संशयिताला आणखी कोण? साथिदार होता का ? याचा तपास सुरु आहे. तसेच संशयित आणखी कोणत्या गुन्ह्यात सहभागी होता का? याचा देखील तपास घेतला जात आहे. लवकरच याबाबतची माहिती समोर येईल असे ही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com