Temple In Goa: बोडगेश्वर देवाला सोन्याचे आसन

Temple In Goa: देवस्थान समितीचा मानस: 26 रोजी बैठकीत होणार अंतिम निर्णय
Temple In Goa
Temple In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Temple In Goa: म्हापसेकर आणि बार्देशकरांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हापशातील श्री देव बोडगेश्वराचा जत्रोत्सव 24 जानेवारी 2024 पासून सुरू होत आहे. त्यानिमित्त यंदा देवस्थान समितीचा देवाला सोन्याचे आसन अर्पण करण्याचा विचार आहे. त्यासंदर्भात येत्या मंगळवारी (ता. 26 ) समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

Temple In Goa
Mhadei River Issue: चिंता वाढली! ‘प्रवाह’ अधिकारिणी अजूनही निद्रावस्थेत; म्हादईप्रश्‍नी सरकार गंभीर

गेल्यावर्षी 67 लाख रुपये खर्चून सोन्याची काठी (दांडा) देवाचरणी अर्पण करण्यात आला होता. हा जत्रोत्सव 4 फेब्रुवारी 2024 पर्यंत चालेल.

म्हापसेकरांसह बार्देशकर तथा समस्त गोमंतकीयांचा राखणदार म्हणून श्री देव बोडगेश्वराची ख्याती आहे. दरवर्षी जानेवारीमध्ये बोडगेश्वराचा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जत्रेचे आकर्षण म्हणजे सात दिवस मोठी फेरी लागते. ज्यात घरगुती वस्तूंपासून सर्वप्रकारचे साहित्य जत्रेत मिळते. याशिवाय विविध खाद्यांचे स्टॉल्स तसेच मनोरंजन पार्क या स्थळी असते.

Temple In Goa
Goa Government Job: कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात तफावत; विजय भिके

याशिवाय जत्रोत्सव काळात नित्यपूजेसोबत भजन, दशावतारी नाट्यप्रयोग व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळते. विशेष म्हणजे विविध संघटनांतर्फे सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे, फुगडी, भजन व घुमट आरती स्पर्धाही भरविल्या जातात.

दरम्यान, याच वर्षी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बोडगेश्वर देवाला सोन्याची मशाल अर्पण केली होती.

या बोडगेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर चारी बाजूने उघडे आहे. मंदिराच्या मध्यभागी देव बोडगेश्वराची हातात काठी, डोक्यावर फेटा असलेली सुबक व आकर्षक मूर्ती पाहावयास मिळते. त्याचप्रमाणे मंदिरात अनेक देव-देवतांच्या आकर्षक सुबक कोरीव मूर्तीही पाहायला मिळतात. म्हापसेकरांची अशी भावना व श्रद्धा आहे की, देव बोडगेश्वर तिथल्या परिसरात रात्रीच्या वेळेस फिरून म्हापसेकरांचे तथा शहराचे राखण करतो. तसेच वाटसरूंना मार्गही दाखवतो. त्याचप्रमाणे बोडगेश्वर आंगवणीचा देव (नवसाला पावणारा) असेही मानले जाते.

यंदा बोडगेश्वर जत्रोत्सवानिमित्त देवाला सोन्याचे आसन देण्याचा विचार आहे. त्यादृष्टीने प्राथमिक चर्चा सुरू असून येत्या 26 डिसेंबरला देवस्थान समितीची बैठक होईल. त्यात अंतिम निर्णय घेतला जाईल. 2025 मध्ये देवाला सोन्याचा फेटा अर्पण करण्याचा विचार आहे.

- आनंद भाईडकर, अध्यक्ष, श्री देव बोडगेश्वर देवस्थान

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com