Goa Elderly Woman: राहतं घर सोडावं म्हणून ७५ वर्षीय महिलेचा शेजाऱ्याकडून छळ; "भाजपला मत देऊन सुद्धा त्रास थांबत नाहीये"

Bomi Zore Silent Protest: स्वतःचे घर वाचवण्यासाठी सांगे तालुक्यातील एका धनगर महिलेने मूक आंदोलन सुरु केले, शेजाऱ्याकडून घर मोडण्यासाठी त्यांचा छळ केला जातोय, यात कैक अधिकारी सुद्धा सामील आहेत,गेल्या दोन वर्षांपासून त्या पंच, सरपंच, मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांची गयावया करीत आहेत मात्र अजूनही त्यांची समस्या सोडवली गेलेली नाही.
Bomi Zore Silent Protest
Bomi Zore Silent ProtestDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: स्वतःचे घर वाचवण्यासाठी सांगे तालुक्यातील एका धनगर महिलेने मूक आंदोलन सुरु केले आहे. बोमी झोरे नावाच्या ७५ वर्षीय वयस्क महिलेने शेजाऱ्याकडून होत असलेल्या छळवणुकीच्या विरोधात आझाद मैदानावर बुधवारी (दि. १६ ऑक्टोबर) रोजी मूक आंदोलन सुरु केले. त्यांच्या मते अनेकवेळा तक्रार नोंदवून देखील शेजाऱ्याच्या विरोधात कोणतीही कारवाई केली गेलेली नाही.

बोमी झोरे सांगतात की शेजाऱ्याकडून घर मोडण्यासाठी त्यांचा छळ केला जातोय, यात कैक अधिकारी सुद्धा सामील आहेत. बोमी झोरे यांच्या मुलींची लग्न झाली असल्याने त्या घरात एकट्याच राहतात.शेजाऱ्याकडून होत असलेल्या छळा संबंधात गेल्या दोन वर्षांपासून त्या पंच, सरपंच, मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांची गयावया करीत आहेत मात्र अजूनही त्यांची समस्या सोडवली गेलेली नाही. शेजारी मारायला धावत असल्याने पोलीस देखील त्यांची तक्रार लिहून घेत नाहीत. त्या म्हणत्यात की भाजपला मत देऊन सुद्धा त्यांची सातवणूक थांबत नाहीये.

स्थानिक कार्यकर्ते रामा काणकोणकर त्यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. रामा काणकोणकर म्हणतात की, सरकार एकाबाजूने जेष्ठ नागरिकांची मदत करण्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहे तर दुसऱ्या बाजूला अशा धनगर समाजातील महिलेला स्वतःच्या हक्कासाठी लढा द्यावा लागतोय. ही दुर्दैवाची बाब आहे. यामध्ये स्थानिक प्रतिनिधींचे राजकरण देखील असू शकते असेही ते म्हणालेत. शेवटपर्यंत आम्ही या वयस्क महिलेच्या सोबत असू असं वचन रामा काणकोणकर यांनी दिलंय.

Bomi Zore Silent Protest
Meghna Cow Missing: ‘मेघना’कुठे गेली! गाय-वासरासाठी मालकाच्या जीवाची घालमेल; फोंडा पोलिस ठाण्यात तक्रार

माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी बोमी झोरे यांची भेट घेतली आणि त्यांना न्याय मिळून देण्याचे अश्वासन दिलं. खरोखरच जर का या महिलेवर अन्याय झालेला असेल तर मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय नकीच पोहोचेल असं ते म्हणालेत. एका ७५ वर्षीय वयस्कर महिलेला हक्कासाठी आंदोलन करावं लागतंय ही खेदजनक बाब असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. एका जेष्ठ महिलेवर घर मोडण्यासाठी दबाव आणला जातोय, तिच्याच राहत्याघरात शौचालयाला जायला दिलं जात नाही, राज्यातील या महिलेला आंदोलन करावं लागणं हे सरकारचं अपयश आहे असं बिना नाईक यांचं म्हणणं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com