IFFI Goa Awards: इफ्फीतील पुरस्कारांची घोषणा, कोणी कोणी मारली बाजी, वाचा संपूर्ण यादी

गोव्यातील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथील सांगता सोहळ्यात चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश असलेल्या आंतरराष्ट्रीय ज्युरींनी पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली.
IFFI Goa Awards
IFFI Goa AwardsDainik Gomantak

IFFI Goa Awards 2023: 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  (इफ्फी) आज प्रतिष्ठेचा सुवर्ण मयूर पुरस्कार जाहीर करण्यात आला. गोव्यातील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथील सांगता सोहळ्यात  चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश असलेल्या आंतरराष्ट्रीय ज्युरींनी पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली.  

महोत्सवात प्रतिष्ठेच्या सुवर्ण मयूर पुरस्काराच्या स्पर्धेत 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय असे 15 सर्वोत्कृष्ट  चित्रपट होते. या पुरस्काराचे स्वरूप 40 लाख रुपये, प्रमाणपत्र आणि सुवर्ण मयूर पदक असे आहे.

कोणी कोणी मारली बाजी, वाचा संपूर्ण यादी

1. 'एंडलेस बॉर्डर्स' या अब्बास अमिनी यांच्या  चित्रपटाने 54 व्या इफ्फी मध्ये पटकावला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयूर पुरस्कार


2. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून  बल्गेरियन दिग्दर्शक स्टीफन कोमांडारेव्ह यांना ‘ब्लागाज लेसन्स’या  चित्रपटासाठी रौप्य मयूर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  


3. एंडलेस बॉर्डर्स साठी पौरिया रहीमी सॅमला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा (पुरुष) सिल्व्हर पिकॉक (रजत मयूर) पुरस्कार.


4. पार्टी ऑफ फूल्स साठी मेलानिया थियरीला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा (महिला) सिल्व्हर पिकॉक पुरस्कार

5. चित्रपट निर्माते आणि अभिनेते ऋषभ शेट्टीला कांतारा साठी विशेष ज्युरी पुरस्कार


6. रेगर आझाद काया यांना  व्हेन द सीडलिंग्ज ग्रो या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटाचा दिग्दर्शक पुरस्कार मिळाला आहे. 

7. अँथनी चेन दिग्दर्शित ड्रिफ्ट चित्रपटाला मिळाला इफ्फी 54 मध्ये प्रतिष्ठेच्या ICFT-UNESCO गांधी पदकाचा बहुमान

8. तर इफ्फीमध्ये प्रथमच सुरु करण्यात आलेला सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) पुरस्कार 2023 ‘पंचायत सीझन 2’ ने पटकावला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com