अफाट समुद्र आणि वातावरणाचे गूढ उकलणार? जगभरातील शास्त्रज्ञ, संशोधकांची 'गोव्यात' अभ्यास परिषद

Surface Ocean Lower Atmosphere Study: अफाट समुद्र आणि तेवढेच विस्तारलेले आकाशातील वातावरण यांचा परस्परांशी संबंध आहे का, यावर जगभरातील संशोधक चार दिवस गोव्यात विचारमंथन करणार आहेत.
Ninth International SOLAS (Surface Ocean - Lower Atmosphere Study) Open Science Conference
Surface Ocean Lower Atmosphere StudyDainik Gomantak
Published on
Updated on

Ninth International SOLAS Open Science Conference In Goa

पणजी: अफाट समुद्र आणि तेवढेच विस्तारलेले आकाशातील वातावरण यांचा परस्परांशी संबंध आहे का, यावर जगभरातील संशोधक चार दिवस गोव्यात विचारमंथन करणार आहेत. दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्‍थेने या परिषदेचे आयोजन १०-१४ नोव्हेंबरदरम्यान संस्थेच्या परिषद सभागृहात केले आहे.

ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँगलियाचे प्रोफेसर पीटर लिस यांच्या हस्ते या परिषदेचे उद्‍घाटन होईल. ही परिषद नववी आंतरराष्ट्रीय सोलस (सरफेस ओशन - लोअर अ‍ॅटमॉस्फियर स्टडी) खुली विज्ञान परिषद म्हणून ओळखली जाणार आहे.

या परिषदेत जगभरातील अग्रगण्य शास्त्रज्ञ आणि संशोधक महासागर आणि वातावरणाच्या परस्पर संबंधांवर संशोधन करणाऱ्या विविध प्रकल्पांवर चर्चा करणार आहेत. एनआयआयचे संचालक प्रा. सुनील कुमार यांनी ही माहिती दिली आहे. देशात अशा प्रकारची परिषद प्रथमच होत आहे. पर्यावरणीय प्रभाव संशोधनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे एकत्र येणार आहेत.

भारतात प्रथमच परिषद

प्रा. सुनील कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलस हा आंतरराष्ट्रीय सहकार्यावर आधारित संशोधन प्रकल्प असून त्याचे उद्दिष्ट समुद्र आणि वातावरणाशी संबंधित संशोधनाला प्रोत्साहन देणे, हे आहे. यावेळी होणारी परिषद ‘सोलस’च्या नव्या ३.० संशोधन योजनेतील नव्या वैज्ञानिक प्राधान्यक्रमांवरही चर्चा करेल. भारतात प्रथमच होणाऱ्या या परिषदेत वेगवेगळ्या सत्रांतून चर्चा, पोस्टर प्रेझेंटेशन आणि शास्त्रीय संवाद सत्रे होणार आहेत.

Ninth International SOLAS (Surface Ocean - Lower Atmosphere Study) Open Science Conference
Calangute Police: मद्यधुंद पर्यटकाला मारहाण भोवली; Video Viral झाल्याने पोलीस हवालदाराची नोकरी धोक्यात

...हे आहे परिषदेचे उद्दिष्ट

काही वर्षांपूर्वी पाऊस येण्यास वारे नव्हे, तर समुद्राच्या पृष्ठभागाचे वाढणारे तापमान कारणीभूत असते, असे संशोधन ‘एनआयओ’तील संशोधकांनी जगासमोर आणले आणि पाऊस येण्याच्या कारणांची फेरमांडणी झाली. अशाच प्रकारचे संशोधन पुढे नेण्यासाठी समान मंच तयार करणे, ज्ञानाचे अदान प्रदान व्हावे यासाठी संशोधक एकत्र येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com