CM Fund: नावेलीतील 40 कुटुंबांना मुख्यमंत्री निधीतून 3 लाख रुपयांची मदत

तुयेकर यांच्या हस्ते नुकतेच या मदतनिधी धनादेशांचे वितरण करण्यात आले.
CM Fund
CM FundDainik Gomantak

नावेलीचे आमदार व कदंब महामंडळाचे चेअरमन उल्हास तुयेकर यांनी नावेली मतदारसंघातील ४० कुटुंबांना मुख्यमंत्री निधीतून ३ लाख रुपयांची मदत मिळवून दिली. तुयेकर यांच्या हस्ते नुकतेच या मदतनिधी धनादेशांचे वितरण करण्यात आले.

CM Fund
गोव्यातील शाळांना दर्जेदार माध्यान्ह भोजन पुरवण्यासाठी अक्षय पात्रासोबत भागीदारी; स्वयं सहाय्य गटांना मुख्यमंत्र्यांचा इशारा

आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणाऱ्या नावेली मतदारसंघातील गरीब व गरजू कुटुंबांना मुख्यमंत्री निधीतून देण्यात आलेल्या या मदतीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार समाजातील वंचित घटकांबाबत संवेधनशील असून या घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.

विकास व योजनांचा लाभ समाजाच्या शेवटच्या पायरीवरच्या माणसापर्यंत पोचवण्याचे या सरकारचे धोरण आहे, असे तुपेकर यांनी यावेळी सांगितले.

दवर्लीचे जिल्हा पंचायत सदस्य परेश नाईक, रुमडामळचे पंच विजय सुरमे, दिकरपाल दवर्लीचे पंच विद्याधर आर्लेकर, संपदा नाईक, संतोष नाईक, आके बायशचे पंच रामदास उसगावकर, रुमडामळ दवर्लीच्या माजी पंच मधुकला शिरोडकर, भाजपच्या नावेली मंडळाचे सरचिटणीस प्रमोद प्रभू, दिनेश महाले, कपिल सरदेसाई यावेळी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com