Panaji News : रेनॉल्ट कायगर, ट्रायबर वाहने गोव्यात विक्रीसाठी दाखल : नवे मॉडेल,नवे फिचर्स

Panaji News : ताळगाव शोरूममध्ये बिझनेस प्रमुख परेरा यांच्या हस्ते अनावरण
Panaji
PanajiDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji News :

पणजी, ताळगाव येथील रेनॉल्ट शोरूमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी नव्या मॉडेलची रेनॉल्ट कायगर व ट्रायबर ही दोन वाहने विक्रीस उपलब्ध करण्यात आली आहेत.

प्रिस्टीन रेनॉल्ट बिझनेस प्रमुख आश्‍विन परेरा तसेच समीर जुवारकर यांच्या उपस्थितीत त्याचे अनावरण करण्यात आले. या नव्या मॉडेल्स अनेक नवीन फिचर्स असल्याने मार्केटमध्ये त्याला चांगली मागणी आहे.

प्रिस्टीन रेनॉल्ट बिझनेस प्रमुख आश्‍विन परेरा यांनी या नव्या मॉडेलसंदर्भात माहिती देताना सांगितले की, रेनॉल्ट कायगर व ट्रायबर ही दोन्ही वाहने ऑटो व मॅन्युएल आहेत. कागयर हे वाहन चालकासह पाच आसने आहेत.

या वाहनात एलईडी केबिन दिवे, मागील आसनांसाठी बेल्ट रिमाईंडर, रेड कॅलिपर्स (टर्बो), प्रिमियम लेथरेट स्टेरिंग व्हिल, बेझेललेस ऑटो डिम आयआरव्हीएम तसेच वेलकम गुडबाय सिक्वेन्सचा समावेश आहे. हे वाहन प्रति एक लिटर इंधनमध्ये २०.५ किमी धावू शकते.

रेनॉल्ट ट्रायबर या वाहनात चालकासह सात आसने आहेत. या वाहनात एलईडी केबिन दिवे, मागील आसनांसाठी बेल्ट रिमाईंडर, पीएम २.५ फिल्टर, पावरफोल्ड ओआरव्हीएम्स, चालकाच्या बाजूने आर्मरेस्ट,

१७.७८ सेंटीमीटर टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जर व टेक व ब्रेक रिमाईंडर याचा समावेश आहे. पुढील आसनांसाठी एअर बॅग्स आहेत. हे वाहन प्रति एक लिटर इंधनमध्ये १९.५ किमी धावू शकते, अशी माहिती परेरा यांनी दिली.

कायगरची वैशिष्ट्ये :

कायगर हे वाहन पाच मॉडेल्समध्ये (आरएक्सई, आरएक्सएल, आरएक्सटी, आरएक्सटी(ओ) व (आरएक्सझेड) असून त्याची शोरूम किंमत ५.९९ लाख ते ११.२२ लाखांपर्यंत आहे. रेडियंट रेड, स्टिल्थ ब्लॅक, कॅस्पियान ब्ल्यू, मूनलाईट सिल्वर, आईस कूल व्हाईट व महोगनी ब्राऊन अशा पाच रंगामध्ये उपलब्ध आहेत.

Panaji
Goa Politics: ‘डबल इंजिन’ सरकार अपयशी, बीना नाईक

ट्रायबरची खासियत

ट्रायबर हे वाहन चार मॉडेल्समध्ये (आरएक्सई), असून त्याची शोरूम किंमत ५.९९ लाख ते ८.९७ लाखपर्यंत आहे. स्टिल्थ ब्लॅक, मूनलाईट सिल्वर, आईस कूल व्हाईट, मेटल मस्टर्ड व सेडर ब्राऊन अशा पाच रंगामध्ये उपलब्ध आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com