म्हापसा: पोरबोवाडा, कळंगुट येथे उभारण्यात आलेली २० बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करण्यात आली आहेत. बार्देश- म्हापसा गट विकास अधकारी (१) यांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. कळंगुट पंचायत, बांधकाम खाते आणि गोवा पोलिसांच्या निरिक्षणाखाली गुरुवारी (१४ नोव्हेंबर) रोजी ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पोरबोवाडा, कळंगुट येथे २० अनधिकृत घरे उभारण्यात आली होती, त्यालगतच सहा स्वच्छतागृह देखील बांधण्यात आली होती. कळंगुट पंचायत आणि गट विकास अधिकाऱ्यांनी याची दखल घेत बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यात आली.
यावेळी बार्देश – म्हापसा गट विकास अधिकारी (१), कळंगुट ग्रामपंचायत सचिव अर्जुन वेळीप, सार्वजनिक बांधकाम खाते आणि कामगारांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. कारवाई पूर्वी संबधित बांधकाम धारकांना रितसर नोटीस बजावण्यात आली होती.
खडपावाडा-कुचेलीत ३६ घरांवर फिरवला बुलडोझर
खडपावाडा-कुचेली येथे सरकारने सरकारने संपादित केलेल्या जागेत अतिक्रमण केलेल्या ३६ घरांवर सोमवारी (११ नोव्हेंबर) राज्य प्रशासनाने बुलडोझर फिरवला. कारवाईनंतर घर धारकांनी याठिकाणी टाहो फोडला. कारवाईवेळी कोणत्याही लोकप्रतिनिधीची मदत झाली नाही, असेही कारवाई झालेले नागरिक म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.