मोठी बातमी! काकोडा येथील महादेव मंदिरात सापडला 10व्या शतकातील 'कदंब'कालीन शिलालेख

कन्नड आणि संस्कृत दोन्ही भाषेत कोरलेला शिलालेख, 10 व्या शतकातील या प्रदेशातील भाषिक विविधता दर्शवितो.
Kannada inscription found In Mahadeva Temple at Cacoda south Goa
Kannada inscription found In Mahadeva Temple at Cacoda south GoaDainik Gomantak

Kannada inscription found In Mahadeva Temple at Cacoda south Goa: दक्षिण गोव्यातील काकोडा येथील महादेव मंदिरात इसवी सनाच्या 10व्या शतकातील एक शिलालेख सापडला आहे. कन्नड आणि संस्कृत या दोन्ही भाषेत लिहिलेला हा शिलालेख कदंब काळातील असल्याचे इतिहास संशोधकांचे मत आहे.

उडपी जिल्ह्यातील मुल्की सुंदर रामा शेट्टी महाविद्यालयातील प्राचीन इतिहास आणि पुरातत्वशास्त्र या विषयात तज्ञ असलेले सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक टी. मुरुगेशी यांनी या शिलालेखाचा अभ्यास केला आहे.

तसेच, गोव्यातील पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्र केरकर यांनी या ऐतिहासिक शोधात सहकार्य केले.

कन्नड आणि संस्कृत दोन्ही भाषेत कोरलेला शिलालेख, 10 व्या शतकातील या प्रदेशातील भाषिक विविधता दर्शवितो. प्राध्यापक मुरुगेशी यांनी केलेल्या विश्लेषणानुसार या शिलालेखाचा संबध गोव्यातील कदंब काळाशी आहे.

शिलालेखावर काय लिहलंय?

इतिहास संशोधकांच्या मतानुसार, तलारा नेवैयाच्या शासनकाळातील एका महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनेचे वर्णन हा शिलालेख करतो. तलारा नेवैयाचा मुलगा गुंडैया याने गोपुरा बंदर काबीज करण्याची आपल्या वडिलांची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून दिले.

या ध्येयाचा धाडसाने पाठलाग करताना गुंदैया यांना आपला जीव गमवावा लागला. शिलालेख या ऐतिहासिक प्रसंगाची नोंद करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com