TV इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपे गोव्यात घेतायेत मान्सूनचा आनंद, लाडक्या बाळासोबत घालवला क्वालिटी टाईम

Actor Rahul Vaidya And Disha Parmar in Goa: 16 जुलै 2021 रोजी लग्न झालेल्या या जोडप्याने यावर्षी त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस गोव्यात साजरा केला.
TV इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपे गोव्यात घेतायेत मान्सूनचा आनंद, लाडक्या बाळासोबत घालवला क्वालिटी टाईम
Actor Rahul Vaidya And Actress Disha ParmarInstagram
Published on
Updated on

पणजी: राहुल वैद्य आणि दिशा परमार हे टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपे आहेत. अलिकडेच पालक झालेल्या दोघे पालकत्वाचा आनंद घेत आहेत.

राहुल आणि दिशा गेल्या वर्षी एका मुलीचे पालक झाले असून, ते त्यांच्या प्रिय मुलीसोबत चांगला वेळ घालवत आहेत. लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवासानिमित्त दोघेही सध्या गोव्यात असून, दिशाने गोवा भेटीटे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

दिशा परमारने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर गोवा भेटीचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये कपलने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढले आहेत.

दिशा आणि राहुल त्यांच्या मुलीसोबत क्वालिटी टाइम घालवताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोस्ट केलेल्या पहिल्या फोटोमध्ये राहुल आणि दिशा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. यामध्ये राहुल दिशाच्या गालावर किस करत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये अभिनेत्री एकटी उभी असताना पोज देत आहे.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये दिशा परमारने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये गोव्याचा व्हि्यू दिसत आहे. दिशाने गोव्यात नव्यासोबत खूप मस्तीही केली, ज्याची एक झलक या पोस्टमध्ये दिसत आहे.

16 जुलै 2021 रोजी लग्न झालेल्या या जोडप्याने यावर्षी त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला.

TV इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपे गोव्यात घेतायेत मान्सूनचा आनंद, लाडक्या बाळासोबत घालवला क्वालिटी टाईम
तेरा वर्षापूर्वी धोकादायक म्हणून केला होता बंद, कारवार-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पूल अखेर कोसळला

'बडे अच्छे लगते हैं 3' फेम अभिनेत्री दिशा परमारने 20 सप्टेंबर 2023 रोजी मुलगी नव्याला जन्म दिला. अभिनेत्रीने 2021 मध्ये गायक राहुल वैद्यसोबत लग्न केले. सध्या राहुल वैद्य लाफ्टर शेफ या कुकिंग-कॉमेडी शोमध्ये दिसत आहे. करण कुंद्रा, कृष्णा अभिषेक, अर्जुन बिजलानी आणि अंकिता लोखंडे यांच्यासह अनेक टीव्ही व्यक्तिमत्त्व या शोमध्ये दिसत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com