लक्षद्वीप बेटावर रंगला संगीत रियाज; हेमा सरदेसाई कडून गोवा, लक्षद्वीपच्या विद्यार्थ्यांनी घेतले संगीताचे धडे

Hemaa Sardesai: संगीत कार्यक्रमात गोव्यातील 11 विद्यार्थ्यांसोबत 17 लक्षद्वीपातील स्थानिक विध्यार्थी यात सहभागी झाले.
लक्षद्वीप बेटावर रंगला संगीत रियाज; हेमा सरदेसाई कडून गोवा, लक्षद्वीपच्या विद्यार्थ्यांनी घेतले संगीताचे धडे
Singer Hemaa SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: लक्षद्वीप ट्यूरिझमच्या सहयोगाने गोवा स्थित Fly 91 या विमान सेवेने गोव्यातील संगीत शिकणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी लक्षद्वीप बेटावर संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गोवा आणि लक्षद्वीपमधील एकूण 28 तरुण संगीत विद्यार्थी सहभागी झाले.

कार्यक्रमासाठी गोव्यातून एकूण 11 विध्यार्थी आणि पुरस्कार विजेते गायिका हेमा सरदेसाई Fly 91 च्या विमानसेवेचा आस्वाद घेत बेटावर दाखल झाले. 13 सप्टेंबर रोजी हा संगीत कार्यक्रम पार पडला. संगीत शिकणाऱ्या या मुलांना हा एक शैक्षणिक अनुभव होता.

गोव्यातील 11 विद्यार्थ्यांसोबत 17 लक्षद्वीपातील स्थानिक विध्यार्थी यात सहभागी झाले. 11 ते 15 वयोगटातील विद्यार्थ्यांचा बेटावर हा एक खास दिवस होता, जिथे ते हेमा सरदेसाई यांच्यासोबत एक मजेदार संगीत सत्रात सहभागी झाले.

हेमा सरदेसाई या गोव्यातील प्रसिद्ध गायिका आहेत, त्यांनी आवारा भँवरे (सपने,१९९६), ये दिल दिवाना (परदेस,१९९७) आणि बादल पे पांव है (चकदे! इंडिया, २००७) या सारख्या लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.

लक्षद्वीप बेटावर रंगला संगीत रियाज; हेमा सरदेसाई कडून गोवा, लक्षद्वीपच्या विद्यार्थ्यांनी घेतले संगीताचे धडे
गोव्यातही मिळणार मोफत वीज! PM 'सूर्य घर'सह प्रत्येक योजना राबविण्याचे CM प्रमोद सावंत यांचे आश्वासन

मुलांनी फक्त संगीताचा आनंदच नाही तर हेमा सरदेसाई कडून मौल्यवान धडे सुद्धा घेतले, ज्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा कार्यक्रम रोमांचक आणि संस्मरणीय अनुभव बनला. चॅरिटी म्युझिकल जॅम दरम्यान बेटावरील शाळेतील विद्यार्थ्यांनी अनेक सांस्कृतिक उपक्रमही सादर केले.

लक्षद्वीप बेटावर रंगला संगीत रियाज; हेमा सरदेसाई कडून गोवा, लक्षद्वीपच्या विद्यार्थ्यांनी घेतले संगीताचे धडे
Anjuna: हणजूण गावकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ? जलवाहिनीत सापडला मेलेला उंदीर, चप्पल आणि प्लास्टिकच्या पिशव्या

Fly 91 चे सीईओ आणि एमडी मनोज चाको कार्यक्रमाबद्दल बोलताना म्हणाले की, प्रतिभावन कलाकार हेमा सरदेसाई यांच्याकडून शिकत असताना तरुणांना सुंदर लक्षद्वीप बेटांचे अन्वेषण करण्याची संधी देण्यासाठी ते उत्साहित आहेत.

मुलांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात मदत करणे आणि समाजाला सकारात्मक दिशेने घेऊन जाणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. सरदेसाई यांच्या मार्गदर्शनामुळे मुलांना खूप फायदा होईल असा विश्वास चाकोने वर्तवला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com