डिचोली मतदारसंघात ‘सायलंट’ मतदान निर्णायक

विजय आपलाच : सर्वच उमेदवारांचा दावा
Voting
Voting Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: शेवटच्या क्षणी अत्यंत चुरस वाढलेल्या डिचोली मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी पाहता, यावेळी डिचोलीत कोण ''सिकंदर'' ठरणार, त्याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. तरीदेखील भाजप आपला ''गड'' राखणार, मगोची ''सिंहगर्जना'' होणार, की अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचे ''हेलिकॉप्टर'' भरारी घेणार, त्याकडे आता मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

एकंदरीत मतदारसंघाचा कानोसा घेतला असता, ग्रामीण भागातील आणि ''सायलंट'' मतदान यावेळी निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट आहे. शेवटच्या टप्प्यात डिचोलीत ''अर्थपूर्ण'' प्रचार झाल्याचे वृत्त आहे. दुसऱ्या बाजूने भाजपसह प्रमुख उमेदवारांनी मात्र विजय आपलाच असल्याचा दावा केला आहे. शहर तसेच ग्रामीण भागातही चर्चेचे फड रंगू लागले आहेत.

Voting
औद्योगिक आस्थापनं रहिवासी भागातून हटवण्याची फोंडेकरांची मागणी

88.84 टक्के मतदान

डिचोली मतदारसंघात यावेळी 88.84 टक्के एवढे उत्स्फूर्त मतदान झाले आहे. एकूण 28,226 पैकी 25,075 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 13,811 पुरुष मतदारांपैकी 12,521 जणांनी तर 14,335 महिला मतदारांपैकी 12,554 जणांनी मतदानाचाहक्क बजावला.

डिचोली मतदारसंघ हे आपले कुटुंब आहे. कार्यकर्त्यांचे बळ आणि मतदारसंघातून मिळालेला प्रतिसाद पाहता, आमदारकीच्या काळात आपण केलेल्या विकासकामांची पावती आपल्याला यावेळी मिळणार. याची खात्री आहे. यावेळी डिचोलीत ''सिंहगर्जना'' होणार याचा विश्वास आहे.

नरेश सावळ, मगो उमेदवार

मतदानादिवशी संपूर्ण मतदारसंघातील मतदान केंद्रांना भेट दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा, निवडणूक प्रमुख देवेंद्र फडणवीस आणि मुंबईतील आमदार राहूल नार्वेकर तसेच भाजपच्या गाभा समितीचे मार्गदर्शन याचा फायदा होणार आहे. कमीतकमी दोन ते सव्वा दोन हजार मतांची आपल्याला आघाडी मिळेल.

राजेश पाटणेकर,भाजप उमेदवार

Voting
सुनील कवठणकर: मतांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांवर भाजपचा दबाव

डिचोलीतील जनतेला यावेळी बदल हवा आहे आणि यावेळी तो नक्कीच होणार आहे. आपणाकडून त्यांच्या अपेक्षा आहेत. कार्यकर्त्यांची तळमळ आणि मतदारांकडून मिळालेला उत्स्फूर्त पाठिंबा पाहता आपण या निवडणुकीत निवडून येणार, याची शंभर टक्के खात्री आहे.

डॉ. चंद्रकांत शेट्ये अपक्ष उमेदवार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com